Indian Railway | जर ट्रेन लेट झाली तर प्रवाशांना मिळेल रिफंड ; जाणून घ्या या विशेष अधिकाराबाबत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । जर ट्रेन लेट झाली तर तुम्हाला टिकिटाचे पूर्ण पैसे परत मिळतात. हा नवीन आदेश नाही परंतु अनेक वर्षापासून प्रवाशांचा अधिकार आहे. परंतु याची खूप कमी लोकांना असते. भारतातील पहली खासगी ट्रेन तेजस ट्रेनबाबत रेल्वेने दावा केला होता की, जर ट्रेन लेट झाली तर प्रवाशांना रिफंड मिळेल. मग उर्वरित ट्रेनचे काय? अनेक भारतीय ट्रेनतर नेहमीच लेट होतात.

भारतीय रल्वे आणि निश्चित वेळेपेक्षा उशीर होणे हे नातेच जुनेच आहे. अनेक प्रयत्नांनंतर देखील अद्याप ट्रेन लेट येण्याच्या तक्रारी सुरूच असतात. ट्रेन निश्चित वेळेत चालणे ही रेल्वेची जबाबदारी असते.

क्लेम करून घेता येतो रिफंड
भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना काही विशेष अधिकार आहेत. यामध्ये ट्रेन लेट झाल्यास टिकिटाचे पूर्ण पैसे रिफंड मिळण्यासाठी क्लेम करता येतो. जर ट्रेन 3 तास किंवा त्यापेक्षा उशीराने आल्यास तुम्ही टिकिट कॅन्सल करून पूर्ण पैसे रिफंड मिळवू शकता. यामध्ये टिकिट कन्फर्म, RAC,waiting काहीही असले तरी पैसे परत मिळतात. हा अधिकार याआधी फक्त काउंटर टिकिटवर होता. परंतु आता ऑनलाईन टिकिट बुकिंगवर देखील नियम लागू झाला आहे.

रिफंड कसे घ्याल
3 तास किंवा त्यापेक्षा लेट झाल्यास तुम्ही टिकिट काउंटरवर जाऊन कॅंन्सल करू शकता. आणि पूर्ण पैसे परत घेऊ शकता. जर टिकिट ऑनलाईन बुक केले असेल तर, तुम्हाला ऑनलाईन TDR (Ticket Deposit Receipt) फॉर्म भरावा लागतो. TDR भरल्यानंतर लगेचच प्रवाशाला टिकिटाचे अर्धे पैसे परत मिळतात. उर्वरित पैसे ट्रेनचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *