महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । वयोमानानुसार माणसाच्या शरीरात (Human Body) अनेक बदल होत असतात; विशेषतः वयाच्या पंचेचाळिशीनंतर (Age of 45 Years) अनेक बदल दिसू लागतात. त्वचा, आरोग्य आणि सहनशक्ती यावर परिणाम झालेला दिसून येतो. अनेक समस्या पहिल्यांदाच जाणवू लागतात. हाडं कमकुवत होणं, केस पातळ होणं, चयापचयाशी संबंधित तक्रारी, दाताच्या तक्रारी जाणवू लागतात. स्त्रियांमध्ये (Female menopause) या वयात मेनोपॉजसारखे (Menopause in Men) महत्त्वाचे बदल घडतात. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणं, हृदय कमकुवत होणं अशा अनेक समस्या दिसू लागतात. त्यामुळे वयाच्या 45व्या वर्षानंतर सर्वांनी हृदय, मेंदू आणि हाडांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
या वयानंतर शरीराचं डी-जनरेशन (D-Generation) सुरू होतं. त्याला पुरुषांमधली रजोनिवृत्ती किंवा अँड्रोपॉज (Andropause) म्हणतात, असं डॉ. मिलिंद प्रकाशकर यांनी एनबीटीच्या (NBT) वृत्तात म्हटलं आहे. वयाला 45 वर्षं होऊन गेल्यानंतर शरीरात चार महत्त्वाचे बदल होतात. त्यावर उपायही असून, दैनंदिन आयुष्यात त्यांचा समावेश केल्यास या महत्त्वाच्या बदलांना सहज तोंड देता येतं.
उंची कमी होते : 45व्या वर्षानंतर शरीरातल्या पेशींचा ऱ्हास झपाट्याने सुरू होतो. हाडांची घनता (Bone Density) कमी होऊ लागते. यासोबतच शरीरातल्या पाण्याचं प्रमाणही कमी होऊ लागतं. त्यामुळे दर 10 वर्षांनी उंची (Height) 1 सेंटीमीटरने कमी होते.
हाडांचे व्यायाम : वयाच्या 45व्या वर्षानंतर हाडं (Bones) ठिसूळ होण्याचं प्रमाण वाढतं. आठवड्यातून किमान चार दिवस दररोज 30 मिनिटं वजन उचलण्याच्या व्यायामात गुरुत्वाकर्षणाविरुद्ध काम करावं लागतं. त्यामुळे हाडं मजबूत होतात.
हृदयाचे ठोके कमी होतात : या वयानंतर, हृदयाचे ठोकेही (Heart Beats) कमी होतात. या वयानंतर हृदयाचे ठोके दर मिनिटाला 60पर्यंत कमी होऊ शकतात. दर दहा वर्षांनी हृदयाची रक्त शुद्धीकरणाची (Blood Pumping) क्षमता 5 ते 10 टक्क्यांनी कमी होते. वयाच्या 25व्या वर्षी, हृदय 2.4 लिटर रक्त पंप करते, तर 45व्या वर्षानंतर ते प्रमाण 2 लिटरपर्यंत कमी होतं.
हृदयासाठी व्यायाम : हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करणारे काही व्यायाम करणं आवश्यक आहे. हृदयाची गती वाढवणारे कार्डिओ व्यायाम (Cardio Exercise) आठवड्यातले चार दिवस रोज किमान 30 मिनिटं करणं आवश्यक आहे. यामध्ये जॉगिंग, जंपिंग, सायकलिंग, दोरीच्या उड्या आदीचा समावेश आहे.
चयापचयाच्या तक्रारी : आपलं शरीर विश्रांती घेत असताना जळणाऱ्या कॅलरीजना आरएमआर (RMR) म्हणतात. व्यायाम केल्यावर जळणाऱ्या कॅलरीजना एनईएटी (NEAT) म्हणतात. 45व्या वर्षानंतर याद्वारे जळणाऱ्या कॅलरीजचं प्रमाण 10 ते 30 टक्क्यांनी कमी होतं.
चयापचय सुधारण्यासाठी व्यायाम : यासाठी रात्रीचं जेवण झाल्यानंतर 15 मिनिटं चाला. तुम्ही जास्त व्यायाम करत नसाल, तर जेवण झाल्यानंतर 15 मिनिटं चाला. यामुळे चयापचय (Metabolism) सुधारेल, असं डॉक्टर सुचवतात.
मेंदू : वयाच्या चाळिशीनंतर मेंदूचं (Brain) वजन दर 10 वर्षांनी सुमारे 5 टक्क्यांनी कमी होऊ लागतं. न्यूरॉन्समधला संबंध कमी होऊ लागतो. मेंदूमध्ये रक्तप्रवाह कमी होतो. विस्मरणाची समस्या उद्भवू शकते.
सर्व इंद्रियांचा व्यायाम : सर्व इंद्रियांचा पुरेपूर वापर करा. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या पाचही इंद्रियांचा पूर्ण कार्यक्षमतेनं वापर करा. याच्याशी आपल्या भावनांचा संबंध असतो. त्यामुळे आपोआपच मेंदूचं कामही सुधारतं.