ITR न भरल्यामुळे द्यावा लागतोय अधिक TDS? हा आहे समस्येवरचा उपाय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फाइल केला असेल आणि तरीही तुम्हाला दुप्पट टीडीएस (TDS) द्यावा लागत असेल तरी तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. वास्तविकपणे, आयकर विभागाने (Income Tax Department) 21 जून 2021 रोजी एक परिपत्रक (Circular) जारी केले असून, त्यात जर एखाद्या व्यक्तीने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला असेल तर त्याचे नाव यादीतून हटवले जाईल आणि त्या व्यक्तीला त्यावर जास्त टीडीएस (TDS) किंवा टीसीएस (TCS)लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जर एखाद्या करदात्याने गेल्या 2 वर्षात टीडीएस दाखल केला नसेल आणि प्रत्येक वर्षी टीडीएसची कपात 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर आयटीआर (ITR) दाखल करताना आयकर विभाग संबंधित व्यक्तीला अधिक शुल्क आकारत आहे. याबाबतचा नियम 1 जुलैपासून लागू करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार, ज्या व्यक्तींनी आयटीआर दाखल केलेला नाही त्यांच्यासाठी 1 जुलैपासून टीडीएस आणि टीसीएसचा दर 10 ते 20 टक्के असेल. यापूर्वी हा दर 5 ते 10 टक्के होता.

ज्या व्यक्तीवर जास्त टीडीएस लागू आहे, अशी व्यक्ती जास्त टीडीएस लागू असणाऱ्या व्यक्तींच्या यादीतून आपले नाव हटवू शकते का? तर हो, अशी व्यक्ती त्या यादीतून आपले नाव हटवू शकते आणि आर्थिक वर्षातील उर्वरित महिन्यांचा अधिक टीडीएस किंवा टीसीएस वाचवू शकते. 2020-21 या अर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करुन हे करता येऊ शकते. परिपत्रकानुसार, एखाद्या विशिष्ट व्यक्तीने मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी उत्पन्नाचा वैध परतावा (फाइल आणि पडताळणी) दाखल केला तर त्याचे नाव विशिष्ट व्यक्तींच्या यादीतून काढून टाकले जाईल. ही प्रक्रिया दाखल करण्याच्या अंतिम तारखेला केली जाईल. मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी उत्पन्न किंवा वैध रिटर्न (फाईल आणि पडताळणी) प्रत्यक्ष फायलिंगच्या तारखेनंतर हटवले जाईल.

आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयटीआर दाखल (ITR Filing) करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021 आहे. तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीस आयकर रिटर्न दाखल केल्यानंतर आणि पडताळणी संपुष्टात आल्यानंतर दोन अर्थिक वर्षांनंतर विशिष्ट व्यक्तींच्या यादीबाहेर ठेवण्यात येईल. अशा प्रकारे एकदा आपण 2020-21 या अर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला की त्याची पुन्हा पडताळणी करा. जर तुम्ही मुदतीत तुमचा आयटीआरदाखल केला असेल आणि त्याची पडताळणी केली असेल तर तुमचे नाव 30 सप्टेंबर 2021 नंतर हटवले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *