महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 29 ऑगस्ट ।केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा कुडाळमध्ये पोहोचली आहे. आज त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा शेवटचा दिवस आहे. थोड्याच वेळात ते कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. काल शिवसेना कार्यकर्ते आणि राणेंची जनआशीर्वाद यात्रा आमने सामने आली होती. यावेळी राणेंनी शिवसेना कार्यकर्त्यांवर नजर रोखली. यावेळी शिवसैनिकांनीही आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. आता आज यात्रेचा शेवटचा दिवस असल्याने वाद प्रतिवादाची शक्यता आहे.