Rajesh Tope | राज्यातील शाळा सुरु करण्यातबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सुतोवाच केलं.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । राज्यात आता फक्त मंदिरं, सिनेमागृह आणि शाळाच बंद आहेत. लहान मुलांच्या जीवाशी कोणतीही तडजोड नको तसेच कोणताही धोका नको म्हणून अजूनही शाळा सुरु केलेल्या नाहीत. मात्र आता शाळा सुरु करण्यात यावी, अशा काहीशा प्रतिक्रिया या पालकवर्गातून येत आहेत. शाळा सुरु करण्यातबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुतोवाच केलंय. (maharashtra health minister rajesh tope reaction over to schools reopen in state)

शाळा सुरू करायचा पहिला टप्पा म्हणजे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे दोन्ही डोस पूर्ण करण्यात येणार. त्यासाठी 5 सप्टेंबरपर्यंत लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. तसेच यानंतर टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री मार्गदर्शन करतील. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *