महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । आज जन्माष्टमी असून रात्री श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जाईल. यावेळी स्मार्त आणि वैष्णव दोन्ही संप्रदायाचे लोक 30 ऑगस्टलाचा जन्माष्टमी साजरी करतील. जन्माष्टमीला सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी रोहिणी नक्षत्र सुरु होईल. वृषभ राशीचा चंद्रही राहील. या राशीमध्ये चंद्र उच्च राहतो. या दिवशी सर्वार्थसिद्धी योगही जुळून येत आहे. हा योग सर्व पूजा-पाठ तसेच एखाद्या मोठ्या कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो. या दिवशी श्रीकृष्णाचे भक्त उपवास करतात.
यावेळी श्री कृष्णाची 5248 वी जयंती साजरी केली जात आहे. श्री कृष्णाचा जन्म द्वापर युगात झाला तेव्हा भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची आठवी तिथी, रोहिणी नक्षत्र, वार बुधवार होता. तसेच त्या दिवशी चंद्र वृषभ राशीत होता. हा योग यावर्षी देखील जुळून आला आहे, फक्त यावेळी सोमवार आहे. श्रीकृष्ण पूजेमध्ये क्रिम कृष्णाय नम: मंत्राचा जप करावा. तुळशीच्या माळेच्या साहाय्याने मंत्राचा जप केल्यास ते खूप चांगले राहते.
बाळगोपाळाच्या मूर्तीला स्नान घालण्यासाठी मोठे भांडे, तांब्याचा कलश, दूध, वस्त्र, आभूषण, तांदूळ, कुंकू, दिवा, तेल, धूपबत्ती, फुल, अष्टगंध, तुळस, जानवे, फळ, मिठाई, नारळ, पंचामृत, सुकामेवा, लोणी-साखर, विड्याचे पान, दक्षिणा इ.
श्रीकृष्ण पूजेमध्ये या मंत्रांचा उच्चार करू शकता
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण-कृष्ण हरे हरे। हरे राम हरे राम, राम-राम हरे हरे।।
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:।।
ऊँ नमः भगवते वासुदेवाय कृष्णाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।
ऊँ नमो भगवते वासुदेवाय नमः।
ऊँ श्री कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय नमः।
ऊँ श्री कृष्णाय नमः।
ऊँ नमो भगवते श्रीगोविन्दाय नम:।
गोकुल नाथाय नमः।
कृं कृष्णाय नमः।
जय श्रीकृष्ण
श्रीकृष्ण पूजेच्या सोप्या स्टेप्स
भक्ताने स्नान करून सर्वात पहिले देवघरातील श्रीगणेशाची पूजा करावी.
श्रीगणेशाला अभिषेक करावा. वस्त्र, फळ-फुल, अक्षदा अर्पण करा. धूप-दीप लावावा.
श्रीगणेश पूजेनंतर श्रीकृष्णाची पूजा सुरु करावी. श्रीकृष्णाला पहिले शुद्ध जल नंतर पंचामृत आणि पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालावे.
श्रीकृष्णाला वस्त्र अर्पण करून आभूषण घालावेत. टिळा लावावा.
हार, फळ-फुल, मिठाई, जानवे, सुकामेवा, नारळ, पंचामृत, विड्याचे पान, दक्षिणा आणि इतर सामग्री अर्पण करावी.
धूप-दीप लावा. तुळशीचे पान टाकून लोणी-साखर आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
पूजा करताना कृं कृष्णाय नमः मंत्राचा 108 वेळेस जप करावा.
कापूर लावावा. आरती करावी. आरतीनंतर प्रदक्षिणा घालावी.
पूजेमध्ये नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमा याचना करावी.
शेवटी भक्तांना प्रसाद द्यावा आणि स्वतःही ग्रहण करावा.