गणेशोत्सव ; कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना निर्बंधातून सूट नाही; राजेश टोपे यांचं मोठं विधान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मोठं विधान केलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना लॉकडाऊनच्या निर्बंधातून सूट देण्यात आलेली नाही, असं राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केलं. (rt-pcr reports need for travelling in konkan during Ganesh festival, says rajesh tope)

राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना निर्बंधात कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी आणि लसीकरणाची अट असणार आहे. सर्व निर्णय विचार करून घेण्यात आला आहे. शासनाच्या आदेशाचे जनहितासाठी तंतोतंत पालन करावे, असं आवाहन टोपे यांनी केलं. तसेच चाकरमान्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस अनिवार्य करण्यात आले असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान राज्यातील रात्रीच्या संचारबंदी विषयी केंद्राच्या सूचनेच्या निर्णयावर चर्चा आहे. याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही. टास्क फोर्ससोबत चर्चा करून यावर मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *