‘कोरोना’पीडित हिंदुस्थानींची मदत चीनने रोखली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – कोरोना व्हायरस पीडितांना मदत साहित्य पोचविण्यासाठी आणि वुहानमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानींना मायदेशी आणण्यासाठी हिंदुस्थानी हवाईदलाची विमाने सज्ज आहेत. मात्र, या विमानांना प्रवेश देण्यास जाणूनबुजून चीनकडून टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप हिंदुस्थानने केला आहे.

कोरोना व्हायरसने चीनमध्ये अक्षरशः कहर माजविला आहे. हुबेई प्रांतातील वुहान शहरात सर्वाधिक भीषण परिस्थिती आहे. हुबेई प्रांतासह चीनच्या इतर भागात हिंदुस्थानी व्यवसायिक, विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी हिंदुस्थानने हवाईदलाची विमाने 20 फेब्रुवारीपासून सज्ज ठेवली. परंतु चीन प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. तसेच ‘कोरोना’शी मुकाबला करण्यासाठी चीनमध्ये ग्लोव्हज, सर्जिकल मास्क, फिडींगपंप यासारख्या वस्तू पाठविण्यात येणार आहेत. त्या विमानांनाही चीनने परवानगी दिलेली नाही. फ्रान्ससह इतर देशांच्या विमानाला मात्र परवानगी दिली गेली. जाणूनबुजून हिंदुस्थानच्या विमानांना टाळण्यात येत असल्याचा आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *