चांगल्या आरोग्यासाठी डिजिटल उपकरणांपासून दूर राहणे गरजेचे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४; अनेक संशोधनाच्या निष्कर्षांवरून मोबाइलमधून निघणाऱ्या विकिरणापासून अनेक आजार बळवतात. त्यामुळे पाचन शक्ती कमकुवत होते. शिवाय झोप न येण्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. डिजिटल वस्तुविषयी लोकांची आवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या उपकरणांमुळे आजार वाढण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी या टिप्सकडे लक्ष द्या.

फोन घेऊन जाऊ नये : एक दिवस मोबाइल शिवाय राहण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मित्रांना भेटायला जाण्याच्या वेळी मोबाइल घेऊन जाऊ नये. शिवाय एक दिवस तरी मोबाइल हातात न घेता जेवण करावे. जुने दिवस आठवत आपण तसे राहण्याचा प्रयत्न करायला हवा.

झोपताना मोबाइल दूर ठेवावा : झोपताना मोबाइल उशापाशी ठेवू नये. दूर ठेवायला हवा. अलार्म लावण्याची सवय असेल तर एखादे छोटे अलार्म लावण्याचे घड्याळ घेऊन यावे आणि त्याचा वापर करावा. अशा प्रकारे तुम्ही माेबाइलपासून थोडे दूर राहा, त्यामुळे तुम्हाला निवांत झोप येईल.

किती वापरता मोबाइल: फोनवर तुम्ही साधारणत: किती वेळ घालवता. ते पाहायला हवे. यासाठी एचएएम, ट्रीम आणि क्वाॅलिटी टाइप अॅपची मदत घेऊ शकता. तोच वेळ तुम्ही तुमच्या मुलांना आणि घरी देऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *