महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । कोरोना काळामध्ये प्रत्येक जण प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. रोगप्रतिका शक्तीत वाढ करण्यासाठी काही लोक चिकन, मटण आणि अंडी खाण्याचाही सल्ला देतात. मात्र शुद्ध शाकाहारी असणाऱ्या लोकांची यामुळे अडचण होते. त्यामुळे आज आपण चिकन, मटण, अंडीएवढेच प्रोटिन असणाऱ्या शाकाहारी पदार्थांबाबत जाणून घेऊया…
1. राजमा (पांढरा)
राजमा (पांढरा) अर्थात केवड्याची बी. शाकाहारी लोकांसाठी प्रोटिन मिळवण्याचा मोठा स्त्रोत राजमा आहे. अर्धा कम राजमामध्ये जवळपास 10 ग्रॅम प्रोटिन असते. म्हणजेच जवळपास एका चिकन लेग पिस एवढेच प्रोटिन यातून आपल्याला मिळते. राजमाचे तुम्ही सूप बनवू शकता किंवा याची उसळ बनवून भातासोबत खावू शकता. तसेच पास्तामध्येही याचा वापर करू शकता.
2. राजगिरा
राजगिरा आपल्याकडे उपवासालाही खाल्ला जातो. एक कप राजगिऱ्यामध्ये 9 ग्रॅम प्रोटिन असतात. राजगिऱ्याचे लाडू, चिक्की किंवा याच्या लाह्या बनवून तुम्ही खावू शकता आणि आवश्यक प्रोटिन मिळवू शकता.
3. शेंगदाणे
शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन असते. एक कप शेंगदाण्यात जवळपास 24 ग्रॅम प्रोटिन असते. कोंबडीच्या 100 ग्रॅम चिकनमध्ये 16 ते 17 ग्रॅम प्रोटिन असते, त्या तुलनेत शेंगदाण्यांमध्ये जास्त प्रोटिन असल्याचे दिसते.
4. सोयिबीन
जनावरांच्या मांसामध्ये फायबर जास्त प्रमाणात आढळत नाही, मात्र शाकाहारी पदार्थांमध्ये फायबर आढळते. अर्ध्या कप सोयाबीनमध्ये 9 ग्रॅम प्रोटिन आणि 4 ग्रॅम फायबर असते. तसेच यात व्हिटॅमिन ए, बी यासह अँटी-ऑक्सिडंटही असते. सोयाबीनचे उसळ करता येते किंवा गहू दळताना थोडे सोयाबीन त्यात घालता येते.
5. भिजवलेला हरभरा
हरभरा प्रोटिनचा मोठा स्त्रोत आहे. शंभर ग्रॅम भिजवलेल्या हरभरामध्ये 50 ग्रॅम प्रोटिन असतात. चिकनच्या तुलनेमध्ये भिजलेल्या हरभरापासून आपल्याला दुप्पट प्रोटिन मिळतात. भिजलेले हरभरे कच्चे खावू शकता किंवा त्याची उसळ बनवू शकता.
6. दूध
आपल्याकडे दुधाला संपूर्ण आहार मानले जाते. दुधामध्ये कॅल्शियम आणि प्रोटिनचे प्रमाण भरपूर असते, यामुळे हाडे मजबूत होतात. एक लिटर दुधामध्ये जवळपास 40 ग्रॅम प्रोटिन असते.