Sovereign Gold Bond मध्ये स्वस्त सोने खरेदीसाठी तुमच्याकडे आहे 2 दिवसांची संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । तुम्हाला देखील स्वस्त सोनं (Cheap Gold) खरेदी करायचे असेल तर तुमच्याकडे ही संधी आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँडची (Sovereign Gold Bond scheme) सहावी सीरिज इश्यू करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील (State Bank of India) याबाबत ट्वीट केले आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँड केवळ स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी नसून यासह तुम्हाला आणखीही काही फायदे मिळतात. SBI च्या माहितीनुसार तुम्हाला 3 सप्टेंबरपर्यंत ही संधी आहे, अर्थात आणखी केवळ दोन दिवस तुम्हाला स्वस्तात सोनंखरेदी करता येणार आहे.

सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या (Sovereign Gold Bond scheme) सहाव्या सीरिजसाठी इश्यू प्राइस 4,732 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ तुम्हाला प्रति तोळा सोन्यासाठी 47,320 रुपये खर्च करावे लागतील.

SBI ने केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याची योजना आहे का? सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्याची सहा गोल्डन कारणं इथे देण्यात आली आहेत. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही http://onlinesbi.com ला भेट देऊ शकता.

>> सॉव्हरेन गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 2.5 टक्के दराने व्याजाचे फायदा मिळेल मिळेल

>> कॅपिटल गेन टॅक्समध्ये सूट मिळेल

>> सॉव्हरेन गोल्ड बाँड्स कॉलॅटरेल स्वरुपात वापरता येईल

>> याशिवाय तुम्हाला सुरक्षेचे टेन्शन राहणार नाही.

>> सॉव्हरेन गोल्ड बाँड तुम्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये सहजगत्या ट्रेड करू शकता

>> हे सोनं खरेदी करताना कोणताही जीएसटी किंवा मेकिंग चार्ज द्यावा लागत नाही.

 

सरकारकडून आरबीआयच्या (Reserve Bank of India RBI) माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातात. या स्कीममध्ये एका आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 4 किलो तर कमीत कमी 1 ग्रॅम गोल्ड बाँडची खरेदी करू शकते. शिवाय ट्रस्ट किंवा यासारख्या संस्था जास्तीत जास्त 20 किलो बाँडची खरेदी करू शकतात. याकरता जारी होणारे अर्ज 1 ग्रम किंवा त्याच्या पटीमध्ये असतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *