सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर भव्य क्रिकेट स्पर्धा उत्साहात !

Spread the love

Loading

छावा स्वराज्य सेना, पिंपरी चिंचवड शहर व्यापारी आघाडीच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

विजेत्या संघांना सन्मानचिन्ह, ट्रॉफी पारितोषिक देऊन केले सन्मानित

महाराष्ट्र 24 । सांगवी (पुणे) । विशेष प्रतिनिधी ।

छावा स्वराज्य सेना तसेच पिंपरी चिंचवड शहर व्यापारी आघाडी यांच्यावतीने सांगवी येथील पीडब्ल्यूडी.मैदानावर भव्य क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये प्रथम विजेते, जयगणेश क्रिकेट क्लब सांगवी, द्वितीय विजेते, शिवप्रहार क्रिकेट क्लब सांगवी, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज रोहित पाटील, सांगवी तर स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, अमोल धोदावले ठरले. सदर स्पर्धेचे आयोजन पिंपरी चिंचवड शहरचे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष सुशांत जाधव यांनी केले. यावेळी विजेत्या संघांना सन्मानचिन्ह, ट्रॉफी व पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण छावा स्वराज्य सेनेचे सस्थांपक अध्यक्ष राम घायतिडक पाटील, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ, प्रदेश महिला अध्यक्षा शितल शितल हुलावळे, पुणे महिला जिल्हाध्यक्षा सुषमा यादव, विध्यार्थी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष, प्रवीण शिंदे, पिंपरी-चिंचवड शहरचे उद्योजक गणेश बनकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाचे अध्यक्ष अजय दादा दुधभाते सुखाई चॅरीटेबल ट्रस्ट औंधचे संस्थापक/अध्यक्ष शिवाभाऊ कांबळे, उद्योजक सतीश भालेकर, सविधान चषक आयोजक शेखर मोरे, उद्योजक अरुण दादा मोरे, छावा चा पुणे शहर अध्यक्ष गणेश कांबळे, पुणे शहर महिला युवा अध्यक्षा पूजा कांबळे, आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी छावा स्वराज्य सेनेचे पिंपरी चिंचवड शहरचे पदाधिकारी व विविध मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. व्यापारी आघाडी पिंपरी-चिंचडवड शहरचे उपाध्यक्ष अंगद जाधव, उमराव जाधव, व्यापारी आघाडी पिंपरीृृ-चिंचवड शहरचे कार्याध्यक्ष, किशोर आटरगेकर, पिंपरी-चिंचवड शहराचे विध्यार्थी उपाध्यक्ष कु समर्थ नरळकर, प्रतिक पडवळ, आभिषेक लोट, प्रशांत जाधव, महादेव गायकवाड, जयेश शिंदे, डॉ, योगेश कणसे, सागर शिंदे, निलेश खैरनार, शेखर शिंदे, निशांत जाधव, तरुण आनंद, सुनील मोरे, तानाजी गरड, वरुण कालेकर, आशिष बनकर, ज्ञानेश्वर बाबळसुरे, माऊली यादव, सागर निंबाळकर, अशोक गपाट, मेहबूब भाई शेख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *