पिंपरी-चिंचवडकरांसाठी चांगली बातमी; पवना धरण 100 टक्के भरले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ सप्टेंबर । गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसराला पाणीपुरवठा कणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी रात्रीपासून रिमझिम पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये पवना धरणक्षेत्रात 29 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात 0.86 टक्क्यांची भर पडली आहे. 1 जूनपासून या क्षेत्रात एकूण 2215 मिमी पाऊस बरसला आहे. गेल्यावर्षीही 5 सप्टेंबरपर्यंत पवना धरण काठोकाठ भरले होते. (Pawna Dam in Maval)

रविवारसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर यलो अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.

पुढचे चार दिवस राज्यात जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून वापसीचे संकेत मानले जात आहेत. राज्या आजपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात हळूहळू पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांत उद्या अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *