देशातील सर्वात मोठे आकाराचे शिवलिंग वेरूळमध्ये साकारतेय ;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ सप्टेंबर । देशातील सर्वाधिक उंचीचे शिवलिंगाच्या आकाराचे ६० फुटी मंदिर वेरूळजवळ साकारत असून या मंदिराच्या गाभाऱ्यात एकाच ठिकाणी देशातील १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींची प्रतिष्ठापना होणार आहे. उज्जैन येथे या प्रतिकृती तयार करण्याचे काम सुरू आहे. एकाच वेळी १२ पिंडींना प्रदक्षिणा घालण्यासाठी विशेष मार्गही करण्यात येणार आहे. श्री विश्वकर्मा तीर्थधाम परिसरात तब्बल २८ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात असून २०२२ च्या शिवरात्रीपर्यंत ते पूर्ण हाेणार आहे. वेरूळहून कन्नडकडे जाणाऱ्या मार्गावर श्री विश्वकर्मा मंदिर आहे. या ठिकाणी मूळ गुजरातमधील चानाेंदचे (बडाेदा) महेंद्र बापू यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्यदिव्य मंदिराचे काम सुरू आहे. पावसाळ्यात पिंडीवर पडणारे पाणी शाळुंकेतून खाली पडतानाचे दृश्य नयनरम्य ठरेल. पिंडीसह संपूर्ण मंदिराचा रंग काळा असेल.

{ एकूण उंची : ६० फूट, पिंड : ४० फूट, शाळुंका : ३८ फूट { मंदिराचा आकार : १०८ बाय १०८ चौरस फूट { २८ वर्षांपासून काम सुरू, २०२२ मध्ये खुले हाेणार

शिवरात्रीला मंदिर खुले हाेणार | १९९५ पासून कामाला सुरुवात झाली. आधी १०८ फूट शिवलिंगाची याेजना हाेती. मात्र निधीअभावी १९९९ मध्ये काम बंद पडले. गेल्या वर्षी पुन्हा वेग आला. येत्या महाशिवरात्रीला मंदिर खुले होईल. हे मंदिर देशातील शिवलिंगाची सर्वात मोठी प्रतिकृती ठरेल. -महेंद्र बापू, श्री विश्वकर्मा तीर्थधाम, वेरूळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *