VIVO : एक भन्नाट स्मार्टफोन घेऊन येत आहे; ड्रोनप्रमाणे उडणार मोबाइलचा कॅमेरा,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ सप्टेंबर । तुम्ही मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी विवो कंपनी एक भन्नाट स्मार्टफोन घेऊन येत आहे. ड्रोनसारखा हवेत उडणारा कॅमेरा फिचर्स स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. जगात पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे. या मोबाईलच्या कॅमे-यातून फोटो काढायचा असल्यास कॅमेरा मोबाईलमधून बाहेर येऊन ड्रोनसारखा हवेत उडतो. या मोबाइल फोनबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

ऍपच्या माध्यमातून कॅमेरा कंट्रोल करून हवा तसा फोटो, व्हिडीओ काढता येणारा आहे. स्मार्टफोनमध्ये एक कंपार्टमेंट देऊन त्यामध्ये हिडेन कॅमेरा सिस्टिम दिली गेली आहे. त्यात दोन कॅमेरा सेंसर्स असतील. या मोबाईलमध्ये एकूण चार कॅमेरा असणार आहेत. सिस्टम इंटीग्रेटेड प्रोपेलर्सच्या मदतीने ड्रोन कॅमेरा हवेत उडणार आहे.

त्यात दिलेले इन्फ्रारेड सेन्सर हा कॅमेरा किती दूर जाईल याचा मागोवा घेईल. हा फ्लाइंग कॅमेरा शूटिंग करताना लवचिकता प्रदान करेल असेही अहवालात म्हटले आहे. हे हवेच्या जेश्चरसह दिले जाऊ शकते. याशिवाय इतर कोणतीही माहिती मिळालेली नाही. जर कंपनीने असे केले तर बाजारात उपस्थित असलेल्या इतर कंपन्यांसाठी हे एक कठीण आव्हान सिद्ध होईल आणि विवो या विभागातील उर्वरित कंपन्यांना मागे टाकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *