दिल्लीत हिंसाचार रोखण्याचे सरकारपुढे आव्हान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हिंसाचार उत्तर पूर्व दिल्ली भागात उग्र रूप धारण करत असल्याचे स्पष्ट होत आहे. उत्तर पूर्व दिल्लीत सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर आज मंगळवारी देखील मौजपूर आणि ब्रह्मपुरी भागात दगडफेकीला सुरूवात झाली आहे. दिल्लीतील या हिंसाचारात आतापर्यंत ५ लोकांचा बळी गेला आहे. यात हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांचाही समावेश आहे. या बरोबरच या हिंसाचारात १०० हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

आज सकाळपासून उत्तर पूर्व दिल्लीत तणावाचे वातावरण आहे. आज सकाळीच ५ दुचाक्यां पेटवून देण्यात आल्या. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिस दाखल झाले आहेत. रात्री उशिरा एका अग्निशमन दलाच्या गाडीलाही पेटवून देण्यात आले तर एका अग्निशमन दलाच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत.

५ मेट्रो स्टेशन्स आणि शाळा-कॉलेज बंद

निर्माण झालेली परिस्थिती पाहता जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर, गोकुलपुरी, जौहरी, अन्क्लेव्ह आणि शिव विहार ही मेट्रो स्टेशन्स बंद ठेवण्यात आली आहेत. संपूर्ण परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या बरोबरच उत्तर पूर्व दिल्लीतील सर्व शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, उत्तर पूर्व दिल्लीच्या आसपासच्या परिसराही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प आज दिवसभर दिल्लीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज सकाळपासून ते रात्रीपर्यंत दिल्लीत राहणार आहेत. दरम्यानच्या काळात ते राजघाट येथे महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाला भेट देणार आहेत. हे लक्षात घेता दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवणे हे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.

रस्त्या-रस्त्यांवर मोठा फौजफाटावरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पूर्व दिल्लीत सुरू असलेला हिंसाचार पाहता सीआरपीएफच्या १० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यात दोन रॅपिड अॅक्शन फोर्सचाही समावेश आहे. क्राइम ब्रँच, स्पेशल स्टाफ, स्पेशन ब्रांच आणि विविध यूनिट्समधील पोलिसांनाही उत्तर पूर्व दिल्लीत कूच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गृहमंत्री अमित शहांनी दिले निर्देश उत्तर पूर्व दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली. हिंसाचार लक्षात घेता शहा यांनी सर्व संबंधित कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या तसेच सुरक्षेशी संबंधित सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तर केंद्रीय गृह सचिव ए. के. भल्ला यांचे देखील परिस्थितीवर लक्ष असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *