T20 world Cup : टी २० विश्व चषकासाठी असा असेल भारतीय संघ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ सप्टेंबर । आगामी बहुचर्चित टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि जय शाह यांच्या नेतृत्वाखालील कमिटीनेे भारताच्या 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. विराट कोहलीवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे तर रोहित शर्मावर कर्णधारपदाची जबाबदारी आहे. भारतीय फलंदाजांचा नेहमीसारखाच तगडा ताफा टी ट्वेन्टी वर्ल्ड कपसाठी जाहीर करण्यात आलाय. तितक्याच तोडीस तोड गोलंदाजीचं आक्रमण देखील असणार आहे. यावेळी वेगवान गोलंदाजीला फिरकीची उत्तम साथ मिळणार आहे. 15 सदस्यीय संघात तीन वेगवान गोलंदाजांसह चार फिरकीपटूंना संधी देण्यात आली आहे.

टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर

भारताचे विश्वचषकातील सामने
भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)
या ठिकाणी रंगणार विश्वचषकाचे सामने

आधी भारतात पार पडणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे आता युएई आणि ओमान देशांत खेळवला जाणार आहे. काही दिवासांपूर्वीच बीसीसीआय़ आणि आयसीसी यांनी संयुक्त बैठकीतून हा निर्णय घेतला होता. दरम्यान युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेचे सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबु धाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी मैदान याठिकाणी खेळवले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *