महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ सप्टेंबर । कोरोनाच्या (Corona) सावटाखाली यंदाही गणरायाचे आगमन होत असले तरी पुण्याच्या (Pune) पारंपरिक गणेशोत्सवाचा (Ganesh Festival) उत्साह कमी झालेला नाही. पर्यावरणपूरक गणेशोत्सव (Ecofriendly Ganesh Festival) साजरा करण्यासाठी घरातच शाडूच्या मातीचे गणपती बनवण्याचा ट्रेंड काही वर्षांपासून दिसून येत आहे. आपल्या हाताने गणपती बनवण्याचा आनंद घरातली बच्चे कंपनी आणि वयस्कर लोकही घेताना दिसतात. गणपती तयार करायला शिकवणाऱ्या खास कार्यशाळाही शहरात ठिकठिकाणी आयोजित केल्या जातात. पुण्यातील बाल कलाकार गौरांग अभिजीत ओंकार वय वर्ष ८ गणेश मूर्तीला रंग देतांना,
यंदा पुण्यात सगळे नियम पाळत व खबरदारी घेत प्रमुख सार्वजनिक गणपती मंडळांनी बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची सिद्धता केली आहे. शुक्रवारी (ता. १०) सकाळी १० ते दुपारी १.३० या कालावधीत बहुतेक मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होईल.
प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी यंदाही निर्बंध असल्याने अनेक मंडळांनी भाविकांसाठी २४ तास ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, गणेशोत्सवाची ओळख असणारे सांस्कृतिक कार्यक्रमही फेसबुक व युट्यूबवरून प्रक्षेपित करण्याचे नियोजन केले आहे.