महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ सप्टेंबर । कधीकधी रात्री अचानक दात दुखण्याची (Home remedies of toothache) समस्या अनेकांना सतावते. काहीवेळा वेदना इतक्या वाढतात की, काहीच सुचेनासे होते. वास्तविक, दातांच्या पोकळीतील किड किंवा त्यातील जंतूंमुळे, दात नीट स्वच्छ न केल्याने, हिरड्यांमध्ये संसर्ग झाल्यामुळे, दातांमध्ये अचानक वेदना होतात. कधीकधी दातदुखी असह्य होते. जर घरात रात्री औषध उपलब्ध नसेल तर ही समस्या आपली झोप उडवू शकते. या परिस्थितीत घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. दातदुखीच्या (tooth health tips) बाबतीत काही घरगुती उपाय आहेेत ते आपण अशावेळी वापरू शकता.
1) जर रात्रीच्या वेळी दात/दाडेमध्ये अचानक वेदना होत असतील तर त्यामध्ये लवंग, पेरूची पाने, आंब्याची साल, नासपतीच्या बिया किंवा झाडाची साल, रताळ्याची पाने, सूर्यफूल बियाणे, तंबाखूची पाने आणि आले दाताखाली ठेवावे. यामुळे वेदनांपासून आराम मिळू शकतो.
2) लिंबूदेखील दातदुखीमध्ये उपयुक्त ठरू शकतो. नैसर्गिकरित्या लिंबूमध्ये आम्ल असते, जे दातांमधील जंतूंना त्वरित मारू शकते. यासाठी जिथे दुखत असेल तिथे लिंबाचा तुकडा ठेवावा. त्यामुळं वेदनांपासून आराम मिळू शकतो.
3) कांद्याचे तुकडे दातदुखीवर देखील फायदेशीर आहेत. कांद्यामध्ये असलेले अँटीमाइक्रोबियल घटक दातांची समस्या दूर करू शकतात. कांद्याचे तुकडे बारीक करून दाताखाली ठेवल्यानं आराम मिळतो.
4) पेपरमिंटची पाने किंवा त्याचे तेलही दातांच्या समस्येपासून आपली सुटका करू शकतात. अचानक वेदना झाल्यास दातामध्ये पेपरमिंट ऑइल लावल्याने वेदनांपासून आराम मिळतो.