मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा टोल महागणार, असे असणार नवे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा टोल महाग होणार आहे. १ एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहेत. MSRDC अर्थात महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हा निर्णय घेतला आहे. तसंय या टोलसाठी नव्या कंत्राटदाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. कारसाठी सध्या २३० रुपये मोजावे लागतात. १ एप्रिलपासून २७० रुपये मोजावे लागणार आहेत.

जाणून घ्या कोणत्या वाहनासाठी किती टोल?

  • कारसाठी सध्याचा टोल आहे २३० रुपये. १ एप्रिलपासून हा दर २७० रुपये होणार आहे.
  • मिनीबससाठी सध्या ३५५ रुपये टोल आकारला जातो. १ एप्रिलपासून हा टोल ४२० रुपये होणार आहे
  • बससाठी सध्या ६७५ रुपये टोल आकारला जातो. १ एप्रिलपासून हा टोल ७९७ रुपये होणार आहे
  • ट्रक टू अॅक्सलसाठी सध्या ४९३ रुपये टोल आकारला जातो. १ एप्रिलपासून हा टोल ५८० रुपये होणार आहे
  • क्रेन किंवा तत्सम अवजड वाहने आणि टू अॅक्सलपेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांना सध्या १५५५ रुपये टोल आकारला जातो. हा टोल १ एप्रिलपासून १८३५ रुपये इतका आकारला जाईल.

पुढील १५ वर्षांसाठी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेचा वापर करण्यासाठी टोल आकारला जाणार आहे. एमएसआरडीसीने नव्या कंत्राटदाराचीही नियुक्ती केली आहे. याआधी २०१७ मध्ये मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल १८ टक्क्यांनी महागले होते. दर तीन वर्षांनी एक्स्प्रेस वेवरील टोलच्या दरात १८ टक्के वाढ होईल अशी अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने २००४ मध्येच काढली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *