सामान्यांना बसणार झटका ! पुढील महिन्यात 10-11 टक्क्यांनी वाढू शकतात CNG चे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ सप्टेंबर ।  सामान्यांना ऑक्टोबर महिन्यात मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. मुंबई त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीमध्ये सीएनसी (CNG) आणि पीएनजी (PNG) चे दर 10 ते 11 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज कंपनी आयसीआयसीआय सिक्योरिटीज (ICICI Securities) ने असा अंदाज व्यक्त केला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, सरकारद्वारे निर्धारित गॅसच्या किमतीत सुमारे 76 टक्के वाढ होणार आहे, ज्याचा परिणाम सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींवरही होईल.

सरकार गॅस सरप्लसच्या देशांचे दर वापरते. सार्वजनिक क्षेत्रातील ओएनसीजीसारख्या कंपन्यांना नामांकनाच्या आधारावर देण्यात आलेल्या क्षेत्रांसाठी नैसर्गिक वायूच्या किमतींचा सरकार दर सहा महिन्यांनी आढावा घेते. पुढील पुनरावलोकन 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

आयसीआयसीआय सिक्योरिटीजने म्हटले आहे की 1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत APM किंवा अॅडमिनिस्टर्ड रेट  (Administered Rate) 3.15 डॉलर प्रति युनिट (MMTTU) पर्यंत वाढेल. सध्या हा दर प्रति युनिट $ 1.79 आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *