साकीनाका बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११सप्टेंबर । साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार Sakinaka Rape Case होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

दरम्यान, साकिनाका बलात्कार (Sakinaka rape case) पीडितेचा मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. मुंबई लौकिक सेफ सिटी म्हणून आपण बघतो, पण आता तरी राज्यसरकारने फास्ट ट्रॅक कोर्टात (Fast Track Court) या प्रकरणाचा खटला चालवावा आणि या घटनांमधील नराधमांनी फाशीची शिक्षाच व्हावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच राज्यसरकारने याबाबत प्रयत्न करावेत असेही फडणवीसांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *