महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ सप्टेंबर । सध्या केसगळती आणि अशक्त केसांचे आरोग्य (Health) हा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. जर तुम्हीही तुमच्या केसांच्या आरोग्याने (Hair Health) त्रस्त असाल तर आपण त्याबाबत काही गोष्टी जाणून घेणार आहोत, कारण सिल्की आणि मऊ केस सर्वांनाच हवे असतात.
आता लोक केसांची निगा राखण्यासाठी केमिकल असलेले काही औषधं आणि तेल वापरत आहेत. त्यामुळे नैसर्गिक आणि काही घरघूती उपाय काय आहेत याची आपण माहिती घेऊयात. केसांना काही साईड ईफेक्ट्स असतात. त्यापासून जर तुम्हासा आपल्या केसांचा बचाव करण्यासाठी मुलतानी माती (Multani) चा वापर हा फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे आपल्या केसांचे सौदर्य आणि आरोग्य राखण्यास मदत होईल. आता त्याचा वापर कसा करावा हे आपण जाणून घेऊयात.
सर्वात आधी दोन कप मुलतानी माती घेऊन ती एक कप पाण्यात मिसळा. त्यानंतर त्याला योग्य पद्धतीने एकत्र करून त्यात एक चमचा लिंबू अथवा मध मिक्स करा, ही पेस्ट तयार केल्यानंतर जवळपास वीस मिनीटे त्याला तसंच ठेवा. तोपर्यंत आपला चेहरा साफ आणि स्वच्छ धूवून घ्या. आणि त्यानंतर तयार झालेली मुलतानी मातीची पेस्च आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. ती जास्त घट्ट होणार नाही, याची काळजी घ्या, चेहऱ्यावर पेस्ट लावल्यानंतर जवळपास वीस मिनीटे पेस्टला चेहऱ्यावर वाळू द्यावे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धूवून घ्या.