सीएस परीक्षेत मुंबईची श्रुती शाह देशात प्रथम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४; मुंबई- कंपनी सेक्रेटरी (सीएस) परीक्षेचे सर्व निकाल मंगळवारी जाहीर झाले असून सीएस प्रोफेशनल परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमांमध्ये मुंबईतील श्रुती शाह देशात प्रथम आली आहे. दुसऱ्या नंबर वर उर्वशी गुप्ता तर याच परीक्षेत मैत्री मेघानी तिसरी आली आहे.

यंदा सीएसची परीक्षा नव्या व जुन्या पद्धतीने घेण्यात आली होती. जुन्या अभ्यासक्रमांमध्ये इंदूरचा हर्शित जैन पहिला आला तर मुंबईचा सुशील कुमावत आणि अब्दुलकादीर कोहझेम जावडवाला हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आले आहेत. तर एक्झिक्युटीव्ह परिक्षेत पुण्याचा अश्विन कल्याणी प्रथम आला तर मुंबईचा अमनदीपसिंग ओबेराय दुसरा आला आहे. या सर्व परीक्षा डिसेंबर २०१९मध्ये घेण्यात आल्या होत्या.

ज्या विद्यार्थ्यांना निकाल पाहायचा आहे ते आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करून निकाल पाहू शकतील. icsi.examresults.net येथे क्लिक करून निकाल पाहता येईल आणि गुणपत्रिका डाऊनलोड करता येईल.

या परीक्षेला प्रोफेशनलच्या नव्या अभ्यासक्रमाचा निकाल ४०.०८ टक्के इतका लागला आहे. तर जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल ३०.११ इतका लागला आहे. तर एक्झिक्युटीव्ह प्रोग्रामच्या नव्या अभ्यासक्रमाचा निकाल ७.६८ टक्के आणि जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल १३.५४ टक्के इतका लागला आहे. सीएसची एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम आणि प्रोफेशनल प्रोग्रॅमची परीक्षा १ ते १० जून या कालावधीमध्ये होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *