PF Account चं हे काम करा लगेच, अन्यथा येईल समस्या

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ सप्टेंबर । कर्मचारी भविष्य निधि संघटना (EPFO) ने EPF अकाउंट आधारशी लिंक करण्याप्रकरणी EPFO सब्सक्रायबर्सला दिलासा दिला आहे. EPF अकाउंट आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. यापूर्वी शेवटची तारीख 31 ऑगस्ट होती. परंतु आता ती 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. PF Account बाबतचं हे काम लगेच करणं आवश्यक आहे.

जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत EPFO आणि आधार नंबर लिंक केला नसेल, तर तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारं पीएफ कॉन्ट्रिब्यूशन थांबू शकतं. त्याशिवाय EPF अकाउंटमधून पैसे काढण्यासही समस्या येऊ शकते. जर EPF अकाउंट होल्डरचं अकाउंट आधारशी लिंक नसेल, तर ते EPFO सर्विसेसचा वापर करू शकणार नाहीत.

EPF अकाउंटशी कसं लिंक कराल आधार –

– सर्वात आधी EPFO पोर्टल epfindia.gov.in वर जा.

– UAN आणि पासवर्डचा वापर करुन आपल्या अकाउंटमध्ये लॉगइन करा. Manage सेक्शनमध्ये KYC ऑप्शनवर क्लिक करा. इथे पेज ओपन झाल्यानंतर EPF अकाउंटशी जोडण्यासाठी अनेक डॉक्युमेंट्स दिसतील.

– आधार कार्डचा पर्याय निवडून आधार नंबर आणि आधार कार्डवरील तुमचं नाव टाईप करुन सेव्ह करा.

– तुमचं आधार UIDAI च्या डेटाशी वेरिफाय केलं जाईल.

– तुमचे KYC डॉक्युमेंट्स योग्य असल्यास, तुमचं आधार तुमच्या EPF खात्याशी लिंक होईल आणि आधार माहितीसमोर Verify असं लिहून येईल.

EPF अकाउंटमध्ये कर्मचारी आणि कंपनी दोन्ही पैसे टाकतात. EPFO अॅक्ट अंतर्गत कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी प्लस DA चे 12 टक्के EPF अकाउंटमध्ये जातात. तर कंपनीही कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरी आणि DA चे 12 टक्के कॉन्ट्रिब्यूशन करते. कंपनीच्या 12 टक्के कॉन्ट्रिब्यूशनमधून 3.67 टक्के कर्मचाऱ्याच्या पीएफ अकाउंटमध्ये जातात आणि इतर 8.33 टक्के कर्मचाऱ्याच्या पेन्शन स्किममध्ये जातात. EPF अकाउंटवर वार्षिक 8.50 टक्के व्याज मिळतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *