रोजच्या उसळीनंतर सोने दरात कमालीची घसरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 -मुंबई :
कोरोना व्हायरचा धसका सराफा व्यवसायानेही घेतला आहे. आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्याच्या व्यवहारांवर झालेले परिणाम पाहता भारतात त्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, आज सोने दरात चांगलीच घसरण पाहायला मिळाली. देशातली बदलती आर्थिक स्थिती, अनेक आतरराष्ट्रीय घडामोडी, चीनमधील कोरोना व्हायरस यासारख्या अनेक गोष्टींमुळे सध्या सोन्याच्या किंमतीमध्ये तेजी पहायला मिळत होती. रोजच्या उसळीनंतर आज सोन्याच्या दरात बरीच घसरण झालेली पाहायला मिळत आहे. एकाच दिवसात सोने दर तब्बल ६२५ रुपयांनी कमी झाला आहे. आज एक तोळा सोन्याचा दर हा ४२ हजार ९०४ रुपयांवर स्थिरावला. काल सोन्याने या वर्षातला उच्चांकी दर गाठला होता.

महत्त्वाचे म्हणजे मागच्या वर्षी आजच्याच दिवशी सोन्याचा दर होता ३३ हजार ३२१ रुपये. म्हणजे एका वर्षात सोन्याचा दर तब्बल १० हजार रुपयांनी वाढला आहे. देशातली बदलती आर्थिक स्थिती, अनेक आतरराष्ट्रीय घडामोडी, चीनमधील कोरोना व्हायरस यासारख्या अनेक गोष्टींमुळे सध्या सोन्याच्या किंमतीमध्ये तेजी दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या काही महिन्यात सोन्याचा दर ५० हजारांचा टप्पा गाठू शकतो असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे.

चांदीचे दरही १.६ टक्क्यांनी घसरले असून, एक किलो चांदीची किंमत ४८,५८० रुपये एवढी आहे. मागील पाच दिवसांत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ पहायला मिळत होती. सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव ४३,७८८ रुपयांवर गेला होता. त्यामध्ये आता ५८४ रुपयांची घसरण झाली. मागील दहा दिवसात सोने २१०० रुपयांनी महागले होते. तर चांदीतही ३००० रुपयांची वाढ झाली होती. चीनमधील कोरोना व्हायरस, अमेरिका-इराणमधील तणाव यामुळे सोने-चांदीत गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. गुंतवणूकदारांनी ‘प्रॉफिट बुकिंग’ला पसंती दिल्याने आज सोन्याचे दर खाली आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *