Tea : चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिऊ नका; आरोग्यावर गंभीर परिणाम होतील

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ सप्टेंबर ।  चहात काही नैसर्गिक गुण (Natural properties) असल्यामुळे लोकांना चहा पिणं हे मूड फ्रेश केल्यासारखं वाटतं. त्यामुळे लोकांच्या आहारात चहा हे पेय फार महत्वाचा भाग बनला आहे. परंतु अनेकदा आपण हॉटेलवर गेल्यानंतर किंवा घरी असताना (Tea side effects) कधी कधी गार झालेला चहा प्यावा लागतो. त्यामुळे त्याचा त्रासही (Is tea healthy?) अनेकांना होत असतो. त्यामुळे गार झालेल्या चहामुळे अनेक आजार होऊ शकतो. अनेक लोक दिवसभरात अनेकदा चहा गरम करून पितात, एकदा केलेली चहा ते वारंवार पितात. त्यामुळे आता त्याचे त्याची काही विपरित परिणाम हे आपल्या आरोग्यावर होतात. त्याचे साईड इफेक्ट्सही असतात, त्यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.

चहाची चवही होते खराब आणि…

वारंवार चहा गरम करून पिल्यामुळे त्यातला सुगंध संपतो. चहाला सुगंध असेल तरच चहा पिण्यात मजा असते. त्याचबरोबर गार झालेल्या चहात त्यातील पोषकतत्वे संपतात.

बॅक्टीरियल ग्रोथ वाढतो.

जास्त वेळ गार झालेल्या चहामुळे आरोग्याला हानीकारक असते. त्यावेळी त्यात मायक्रोबियल तयार होतात. हे माइल्ड बॅक्टीरिया आरोग्यासाठी फार हानीकारक असतात. अनेकदा आपल्या घरात बनणाऱ्या चहात दुधाचे प्रमाण हे अधिक असते. त्यामुळे जर ती चहा गार झाली तर त्यातील पोषकतत्वे संपतात.

आरोग्यासाठी हानिकारक

चहाला वारंवार गरम करून पिल्यामुळे आरोग्याला मोठी हानी पोहचते. त्यामुळे पोट दुखणे आणि इंफ्लामेशन होण्याची शक्यता असते.

 

काय करायला हवे?

तयार झालेला चहा 15 मिनीटांच्या आत प्या   .

चहा फार वेळ गार करत ठेवणं धोक्याचं ठरू शकतं.

जेवढी आवश्यकता आहे तेवढीच चहा बनवा आणि प्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *