जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, निकाल कुठं पाहायचा?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ सप्टेंबर । JEE Main Result: जेईई मेन 2021 सेशन्स 4 चा निकाल मंगळवारी रात्री उशिरा घोषीत करण्यात आलाय. यात रेकॉर्डब्रेक अशा 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के मार्क मिळवलेत. तर नंबर 1 रँकवर 18 जण आहेत. विशेष म्हणजे यावर्षी 7 लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी जेईईची परिक्षा दिलेली होती. ज्या 18 जणांनी रँक 1 मिळवलीय त्यात महाराष्ट्रातून अथर्व अभिजीत तांबट हा एकमेव मराठी विद्यार्थी आहे. आंध्राचे सर्वाधिक 4 तर त्यापाठोपाठ राजस्थानचे 3, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणाचे प्रत्येकी 2 विद्यार्थी टॉप 18 मध्ये आहेत. भाषिकदृष्ट्या तुलना केली तर सर्वाधिक 6 विद्यार्थी हे आंध्र-तेलंगणाचे आहेत. नंबर वन वर कर्नाटकचा गौरब दास आहे. तर, 44 उमेदवारांना 100 एनटीए परफेक्ट गुण मिळाले आहेत.

जेईई मेन 2021 चा अंतिम निकाल कसा पाहायचा?

 1: निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर भेट द्या.
 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
 3: तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करून लॉगिन करा.
 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
 5: निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *