पण पराभूत झालो तर हा बाजार पूर्णत कोसळेल’;डोनाल्ड ट्रम्प

Spread the love

महाराष्ट्र २४- अध्यक्षीय निवडणुकीत मी पुन्हा विजयी झालो तर बाजार रॉकेट सारखा उसळी घेईल, पण पराभूत झालो तर हा बाजार पूर्णतः कोसळेल’,असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उद्योगपती आणि कंपन्यांच्या सीईओच्या बैठकीतील प्रश्नोत्तराच्या सत्रात   केले. आपण अध्यक्षीय निवडणुकीत विजय होऊ असा आत्मविश्वास व्यक्त करताना ते म्हणाले ङ्गङ्घहेल्थकेअर, नोकर्‍या, रोजगाराची निर्मिती, लष्कर इत्यादी क्षेत्रात आम्ही भरपूर काम केले आहे. करदरात कपात केली असून सरकारी नियमनही अनेक ठिकाणी शिथिल केले आहेफफ. ङ्गङ्घनोकर्‍यांबाबत सरकार फक्त मदत करण्याचे काम करू शकते. खर्‍या नोकर्‍या तर खाजगी क्षेत्रच निर्माण करू शकतातफफहेही त्यांनी निदर्शनास  आणले.‘अध्यक्षीय निवडणुकीत माझा पराभव झाला तर कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजार कोसळल्याशिवाय राहणार नाही. तसेच बेकारीच्या  टक्केवारीचे प्रमाण  8 ते 10 टक्क्यापर्यंत वाढेल’, हा धोकाही त्यांनी निदर्शनास आणला. कोरोना विषाणुच्या परिणामाबाबत ते म्हणाले, ‘या विषाणुचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी चीन आटोकाट प्रयत्न करीत आहे. मी याबाबत चीनच्या अध्यक्षांशी बोललो. या विषाणुवर त्याने नियंत्रण मिळवत आणले आहे’. 

भारत अमेरिका यांच्यातील 21.5 हजार कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर खरेदी कराराचाही उल्लेख त्यांनी केला. भारत भेटीच्या संदर्भात  बोलताना ते म्हणाले, इथे मला निमंत्रित केले, हा माझा मोठा सन्मान आहे. आपले पंतप्रधान खूप चांगले काम करीत आहेत. ते एक खास व्यक्ती असून निर्णय घेण्यात अधिक कणखर आहेत. आम्ही दोघे एकत्र येऊन आता काम करीत आहोत.

या बैठकीला रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी, भारतीय एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल, टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन, महिंद्रा उद्योगसमुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष ए एम नाईक, ‘बायोकॉन’च्या व्यवस्थापकीय संचालक किरण मजूमदार शॉ , अर्सेलर मित्तलचे लक्ष्मीविलास मित्तल आदी उपस्थित होते.

आयटी कंपन्यांसाठी नियम शिथिल 

येत्या काही महिन्यात अमेरिकेतील काही वाणिज्य नियम शिथिल केले जाणार असल्याने भारतीय आयटी कंपन्यांना अमेरिकेत कारभार करणे अधिक सोयीचे जाणार आहे. उद्योगपती व सीईओंच्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत सांगितले की, तंत्रज्ञान कंपन्यांबाबतचेनियम येत्या सात ते आठ महिन्यात शिथिल केले जातील. अमेरिकेची उद्योगविषयक धोरणे, त्यात केल्या जात असलेल्या सुधारणा, कर दरातील कपात इत्यादींबद्दल भारतीय उद्योगपतींनी ट्रम्प यांची प्रशंसा केली. अर्सेलर मितल चे सीईओ लक्ष्मी निवास मितल यांच्या कामगिरीचे ट्रम्प यांनी कौतुक केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *