आजपासून भारतात Apple iphone 13 सीरीजचे प्री-बूकिंग झाले सुरू, ही आहे खास ऑफर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ सप्टेंबर । Apple iPhone 13 स्मार्टफोन अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत, कॅनडा, चीन, जर्मनी, जपान आणि यूके यासह जगातील 30 हून अधिक देशांमध्ये विकले जाणार आहे. आजपासून या स्मार्टफोनची प्री-बुक केली जाणार आहे. तसेच अॅपल आयफोनची क्रेझअसलेले ग्राहक आजपासून कंपनीच्या लेटेस्ट आयफोन १३ सीरीजचे प्री-बुकिंग करू शकतील. Apple आज संध्याकाळी ५:३० वाजल्यापासून आयफोन १३, आयफोन१३ प्रो, आयफोन १३ प्रो मॅक्स आणि आयफोन १३ मिनी साठी प्री-ऑर्डर करायला सुरू झाली आहे. ग्राहक Apple Online Store आणि ई-कॉमर्स साइटसह देशभरातील रिटेल स्टोरच्या माध्यमातून नवं आयफोन मॉडेल प्री-ऑर्डर करू शकतात. आजपासून Amazon आणि Flipkart या साइटवर प्री-ऑर्डर घेण्यास सुरुवात झाली आहे.

ग्राहकांनी HDFC बँक कार्डचा वापर करुन Apple Authorised Distributor च्या माध्यमातून आयफोन १३ आणि आयफोन १३ मिनी प्री- ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना ६००० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसंच HDFC बँक कार्डद्वारे आयफोन १३ प्रो आणि आयफोन १३ प्रो मॅक्स खरेदीवर तुम्हाला ५००० चा डिस्काउंट मिळेल. जुन्या मॉडेलच्या एक्सचेंजवर ३००० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. ग्राहकांना आयफोन १३ खरेदीसाठी EMI चा पर्यायही उपलब्ध करण्यात आलेला आहे.

भारतात आयफोन १३ बेस १२८ जिबी वेरिएंटची किंमत ७९,९०० रुपयांपासून सुरू होते. तर आयफोन १३ च्या २५६ जिबी वेरिएंटची किंमत ८९,९०० आणि ५१२जिबी ची किंमत १,०९,९०० रुपये आहे. त्याशिवाय आयफोन १३ प्रोच्या १२८ जिबी स्टोरेज मॉडेलची किंमत १,१९,९०० रुपये आहे. याच्या २५६ जिबी वेरिएंटची किंमत १,२९,९०० आणि ५१२ जिबी स्टोरेज वेरिएंटची किंमत १,४९,९०० रुपये आहे.

आयफोन १३ च्या १TB वेरिएंटची किंमत १,६९,९०० रुपये आहे. तर आयफोन १३ प्रो मॅक्स च्या १२८ जिबी स्टोरेज मॉडेलची किंमत १,२९,९०० रुपये आहे. आयफोन १३ प्रो मॅक्सच्या २५६ जिबी मॉडेलची किंमत १,३९,९०० रुपये, ५१२ जिबी वेरिएंटची किंमत १,५९,९०० रुपये आणि आयफोन १३ प्रो मॅक्सच्या 1TB स्टोरेजची किंमत १,७९,९०० रुपये आहे. आयफोन १३ सीरिजमध्ये सर्वात स्वस्त आयफोन १३ मिनी आहे. याच्या १२८ जिबी वेरिएंटची किंमत ६९,९०० रुपये आहे. तर २५६ जिबी स्टोरेजची किंमत ७९,९०० रुपये आणि ५१२ जिबी स्टोरेज ९९,९०० रुपयांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *