Home Loan साठी अप्लाय करताना हे महत्त्वाचे मुद्दे अजिबात विसरू नका ; त्वरित मिळेल कर्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ सप्टेंबर । तुम्ही देखील घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी होम लोन घेण्याचा (Planning for Home Loan) विचार करत असाल तर . हे मुद्दे लक्षात घेतल्यास तुम्हाला सहजपण लोन उपलब्ध होऊ शकतं. जाणून घ्या काय आहेत

# निश्चित करा की तुम्ही किती EMI भरू शकता-

होम लोन घेताना हा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे. तुम्ही किती EMI भरू शकता हे जाणून घेणं आवश्यक आहे कारण दीर्घकाळासाठी ईएमआय भरला जातो. याकरता तुमच्या टेक होम सॅलरीतून इतर खर्च जसं की इतर कर्जाचा EMI, क्रेडिट कार्ड बिल आणि इतर खर्च इ. वगैरे वजा करा. त्यानंतर तुम्ही किती EMI भरू शकता याचा अंदाज लावता येईल. साधारणत: बँका टेक होम सॅलरीच्या 40 टक्क्यांपर्यंत EMI ची परवानगी देतात.

# जास्त लोनसाठी अप्लाय केल्यास समस्या येऊ शकतात-

तुम्ही पात्रतेपेक्षा जास्त कर्जासाठी अप्लाय केल्यास तुमचं कर्ज नाकारालं जाऊ शकतं. त्यामुळे आधी हे माहित करून घ्या की किती कर्ज घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात. यानंतर तुम्ही किती डाउनपेमेंट करू शकता याचा अंदाज लावता येईल

# ज्या बँकेत खातं आहे तिथे कर्जासाठी अर्ज करणं ठरेल फायद्याचं-

तुमच्या ज्या बँकेत बचत खातं किंवा सॅलरी अकाउंट आहे त्याठिकाणीच शक्यतो होम लोनसाठी अप्लाय करा. जर बँकेला आधीपासून तुमची क्रेडिट हिस्ट्री, वैयक्तिक माहिती-कंपनी आणि सॅलरी याबाबत माहिती असेल तर केवायसी प्रक्रिया सोपी होईल. तुम्हाला दीर्घकाळ वाट पाहावी लागणार नाही

# क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा-

तुमचा रिपेमेंट रेकॉर्ड आणि क्रेडिट स्कोअर (सिबिल स्कोअर) चांगला असेल तर कर्ज मिळवायला सोपं जाईल. अनेकदा चांगला क्रेडिट स्कोअर असणाऱ्यांना कमी व्याजदराने देखील कर्ज उपलब्ध केलं जातं.

# प्रोजेक्टला सर्व क्लिअरन्स मिळालेले असणे आवश्यक-

तुम्ही ज्या प्रोजेक्टमध्ये घर किंवा फ्लॅट खरेदी करताय त्यांच्याकडे आवश्यक रेग्युलेटरी क्लिअरन्स असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या बँकेच्या लिस्टमध्ये तपासू शकता की तो प्रोजेक्ट लिस्टेड आहे की नाही. यामुळे होम लोन लवकर मंजुर होते

# जास्त लोन हवं असेल तर हे लक्षात ठेवा-

तुमच्या पगाराच्या तुलनेत तुम्हाला जास्त कर्ज हवं असेल तर काय करता येईल असा प्रश्न उपस्थित होतो. तुम्ही पती-पत्नी/आई-वडील/भाऊ-बहिणीसग जॉइंट लोनसाठी अर्ज करू शकता. तुम्ही हवं तर दीर्घकाळासाठी रिपेमेंटचा पर्याय निवडू शकता. यामुळे तुमचा EMI कमी होईल आणि महिन्याचं बजेट बिघडणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *