महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ सप्टेंबर । गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने पुणे, मुंबईत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुण्याची वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही कोविडच्या परिस्थितीत होणार नाही. मानाच्या आणि महत्वाच्या गणपती मंडळांनी उत्सव मंडपातच गणपती विसर्जन करायचा निर्णय यंदाही घेतला आहे. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमधे उद्या विसर्जनादिवशी सर्व दुकाने बंद राहणार असून बंदोबस्तासाठी सात हजार पोलीस तैनात असणार आहेत. उद्या सकाळी दहा वाजल्यापासून विसर्जनाला सुरुवात होणार आहे. नागरिकांना विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहता येणार आहे.
पुण्यातील गणपतींच्या विसर्जनाच्या वेळा पुढीलप्रमाणे
# मानाचा पहिला गणपतीश्री कसबा गणपती – सकाळी 11 वाजता
# मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी – सकाळी 11.45 वाजता
# मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम – दुपारी 12.30 वाजता
# मानाचा चौथा श्री तुळशीबाग – दुपारी 1.15 मिनीटे
# मानाचा पाचवा केसरी वाडा – दुपारी 2 वाजता
# श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती – दुपारी 2.45 वाजता
# श्रीमंत दगडूशेठ हलवाई- संध्याकाळी 6.36 वाजता
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन गणेश विर्सजनाच्या दिवशी गर्दीवर नियंत्रण ठेवून गणेश मूर्तीच्या विसर्जनाचे योग्य नियोजन करावे आणि कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.