IPL 2021: आज मुंबई चेन्नईशी भिडणार ; प्रेक्षकांचीही उपस्थिती,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ सप्टेंबर । आयपीएल 2021 (IPL 2021)च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आजपासून होत आहे. पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई आणि तीन वेळा विजयी झालेल्या चेन्नईदरम्यान आजचा सामना रंगणार आहे. आयपीएल 2021 च्या या टप्प्याचा विजयी आरंभ करण्यास मुंबई इच्छुक आहे. मागील टप्प्यामध्ये झालेल्या सामन्यांमध्ये आतापर्यंत दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये आघाडीवर आहे तर हैदराबाद तळाला आहे. 4 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमणार आहे. कारण आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना मैदाना उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजकांनी याबाबत माहिती दिली. संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत.

Delhi Capitals: आयपीएल 2021च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्लीनं शानदार प्रदर्शन केलं आहे. दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये टॉप वर आहे. दिल्लीनं आतापर्यंत आठपैकी सहा सामने जिंकले आहेत.

Chennai Super Kings: महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं आतापर्यंत यंदाच्या आयपीएलमध्ये सातपैकी पाच सामने जिंकले आहेत. चेन्नई 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या टप्प्यात चेन्नई सात सामने खेळणार आहे.

RCB: विराट कोहलीच्या बंगळुरुनं आतापर्यंत पाच सामने जिंकले आहेत. 10 अंकांसह बंगळुरु तिसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीनं आतापर्यंत सातपैकी पाच सामने जिंकले आहेत. पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई आणि तीन वेळा विजयी झालेल्या चेन्नईदरम्यान उद्याचा सामना रंगणार आहे. मुंबईनं आतापर्यंत सातपैकी चार सामने जिंकले आहेत. 8 अंकांसह मुंबई चौथ्या स्थानावर आहे. आता यंदाचा आयपीएल जिंकत मुंबई विजयी हॅटट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुंबईला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आपल्या दुसऱ्या टप्प्यातील सातपैकी चार सामने जिंकणं आवश्यक आहे.

Rajasthan Royals: संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा संघ पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. राजस्थाननं पहिल्य़ा टप्प्यात आपल्या सात सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत.

Punjab Kings: केएल राहुलच्या नेतृत्वात पंजाब पॉइंट टेबलमध्ये सहाव्या नंबरवर आहे. पहिल्या टप्प्यात पंजाबनं आठ पैकी तीन सामने जिंकले आहेत. पंजाबला प्ले ऑफमध्ये जायचं असेल तर उर्वरित सहापैकी पाच सामने जिंकावे लागणार आहेत.

KKR: कोलकाताचा संघ आयपीएल 2021 चांगली राहिलेली नाही. कोलकाता टीम पॉईंट टेबलमध्ये सातव्या नंबर वर आहे. केकेआरनं पहिल्या टप्प्यातील सात सामन्यांपैकी केवळ दोन सामने जिंकले आहेत.

SRH: हैदराबादनं आयपीएल 2021 मध्ये पहिल्या टप्प्यात खूपच निराशाजनक प्रदर्शन केलं आहे. हैदराबाद आतापर्यंत पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खाली आहे. हैदराबादनं सात सामन्यांपैकी केवळ एक सामना जिंकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *