पितृपक्ष:घरी श्राद्ध कसे करावे ; पितरांच्या शांतीसाठी जाणून घ्या विधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० सप्टेंबर । 20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत पितृपक्ष राहील. या काळात पितरांच्या तृप्तीसाठी श्राद्ध केले जाते. धर्मग्रंथांमध्ये यात्रार्थ श्राद्ध म्हणजे तीर्थस्थानांवर जाऊन श्राद्ध करण्याचे महत्त्व सांगितले गेले आहे, परंतु कोरोना महामारीमुळे घरतीच सहज पद्धतीने श्राद्ध करता येऊ शकते.

श्राद्धातील आवश्यक गोष्टी
तर्पण, पिंडदान आणि ब्राह्मण भोजन, या तीन गोष्टी श्राद्धात विशेष आहेत. पूजेच्या सर्व आवश्यक गोष्टींव्यतिरिक्त, विशेषतः स्वच्छ भांडी, जवस, तीळ, तांदूळ, कुशा गवत, दूध आणि पाणी तर्पणसाठी आवश्यक आहे. पिंड दानासाठी, तर्पण, तांदूळ आणि उडीद पिठ आवश्यक आहे. त्याचबरोबर ब्राह्मण अन्नासाठी लसूण-कांदा आणि कमी तेल, मिरची-मसाल्याशिवाय सात्विक अन्न तयार करावे. ज्यामध्ये हविष्य अन्न अर्थात भात असावा, म्हणून श्राद्ध पक्षात खीर बनवली जाते.

घरीच अशाप्रकारे करू शकता श्राद्ध आणि तर्पण

श्राद्ध असलेल्या तिथीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि श्राद्धकर्म होईपर्यंत काहीही खाऊ नये. केवळ पाणी पिऊ शकता.
दिवसाचा आठवा मुहूर्त म्हणजे कुतूप काळात श्राद्ध करावे. जो 11:36 ते 12:34 पर्यंत राहतो.
दक्षिण दिशेला मुख करून डाव्या पायाचा गुढगा जमिनीला टेकवून बसावे.
त्यानंतर तांब्याचे खोलगट भांडे घेऊन त्यामध्ये जवस, तीळ, गाईचे कच्चे दूध, गंगाजल, पांढरे फुल आणि पाणी टाकावे.
हातामध्ये दर्भ, कुश (एक प्रकारचे गवत) घेऊन पाणी हातामध्ये घेऊन उजव्या हाताच्या अंगठ्याने तांब्याच्या भांड्यात पाणी सोडावे. ही प्रक्रिया 11 वेळेस करत पितरांचे ध्यान करावे.
महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी भोजन तयार करावे.
पितरांसाठी अग्निमध्ये खीर अर्पण करावी. त्यानंतर पंचबली म्हणजे देवता, गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्यांसाठी भोजन सामग्री वेगळी काढून ठेवावी.
त्यांनतर ब्राह्मणांना जेवू घालावे आणि श्रद्धेनुसार दक्षिणा, इतर सामग्री दान करावी.
यावेळी महामारीमुळे अनेक लोकांचा अंत्यसंस्कार विधिपूर्वक करणे शक्य झाले नाही. त्यांच्यासाठी याज्ञवल्क्य स्मृती आणि बौधायनच्या ग्रंथपितृमेधसुरतमध्ये पुत्तल-दाह क्रिया सांगण्यात आली आहे.

यामध्ये श्राद्धपक्ष काळात मृत व्यक्तीच्या मृत्यू तिथीला उडदाच्या पीठाने त्या व्यक्तीचा पुतळा बनवून विधिपूर्वक दाह संस्कार केला जातो.
त्यानंतर त्याच्यासाठी पिंडदान केले जाते. त्यानंतर सर्वपितृ अमावास्येला त्या व्यक्तीचे श्राद्धही केले जाते.
ज्या लोकांचा अंत्यसंस्कार विधिपूर्वक झाला नसेल, त्यांच्या आत्मा शांतीसाठी ग्रंथांमध्ये सूर्य पूजा सांगण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *