धक्कादायक प्रकार ; ST driver suicide: एसटी चालकाची आत्महत्या, बसमध्येच घेतला गळफास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ सप्टेंबर । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation) अर्थात एसटी बसच्या चालकाने बसमध्ये गळफास (ST bus driver commits suicide) घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगरमधील संगमनेर बस डेपोमध्ये (Sangamner bus depot) हा प्रकार घडला असून या घटनेने एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे. मृतक बस चालकाचे नाव सुभाष तेलोरे असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसटी बसचे चालक सुभाष तेलोरे यांनी अहमदनगरमधली संगमनेर बस डेपो येथे एसटी बसमध्येच गळफास घेत आयुष्य संपवलं. रात्रीच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला. पाथर्डी – नाशिक या बसचे ते चालक होते. संगमनेर बसस्थानकात डिझेल नसल्यानं नाशिकला न जाता संगमनेरला बस मुक्कामी होती. त्यावेळी रात्रीच्या सुमारास त्यांनी कपड्याच्या सहाय्याने बसमध्ये गळफास घेतला.

एसटी चालक सुभाष तेलोरे हे कोल्हार तालुक्यातील पाथर्डी येथील निवासी असून ते एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर कर्ज होते आणि कर्जाचा बोजा वाढत असल्याने त्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन हा मुद्दा अनेक दिवसांपासून चर्चेत होता. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही आणि त्यामुळे घरदार कसे चालवायचे कसे असा प्रश्नही एसटी कर्मचाऱ्यांना पडत आहे. त्यानंतर एसटी कामगार संघटनेने न्यायालयातही धाव घेतली होती. त्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीस थकित पगार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात झाला.

कोरोनामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. त्यामुळे कामगारांना पगार देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नव्हते. परिणामी कामगारांचे वेतन थकीत होते. यामुळे शासनाने एक हजार कोटीची आर्थिक मदत करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षी एसटी बस वाहतूक बंद असताना शासनाकडून मिळालेल्या निधीतून कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले होते. मात्र, आता हा निधी सुद्धा संपला असून कर्मचाऱ्यांचा वेतनाचा आणखी प्रश्न निर्माण झालेला आहे. या सर्वांमुळे महामंडळातील ९७ हजार कर्मचारी आणि अधिकारी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *