Whats app हटवणार हे फिचर, नवीन अपडेट काय ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ सप्टेंबर । लोकप्रिय मेसेजिंग अॅप Whats app गेल्या काही काळापासून बरेच चर्चेत आहे. कारण कंपनीने सर्व आयओएस आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी मल्टी-डिव्हाइस बीटा टेस्ट रोल आऊट केली होती. यासोबतच फेसबुकच्या मालकीचे असलेले हे Whats app अॅप आणखी बरीच वैशिष्ट्ये (फिचर) सुरू करण्याचे काम करत आहे. ग्रुप आयकॉन एडिटरप्रमाणे आणि अँड्रॉइड फोनवरून आयफोनवर सर्व चॅट ट्रान्सफर करणे याचा समावेश आहे. पण, व्हॉट्सअॅप वरून काही फीचर्स देखील काढून टाकले आहेत.

एका वर्षापूर्वी व्हॉट्सअॅपमध्ये अॅड केलेले एक फिचर आता काढले जाणार आहे. तुम्ही यापुढे WhatsApp मध्ये मेसेंजर रूम सेवा वापरू शकणार नाही. WABetaInfo च्या बातमीनुसार, WhatsApp मेसेंजर रूम शॉर्टकट आता चॅट शेअर सीटवरूनही काढले जाईल. हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हींमधून काढले जाईल.

हे व्हॉट्सअॅप शॉर्टकट मे 2020 मध्ये लाँच करण्यात आले होते. ज्यामुळे वापरकर्त्यांना फार कमी वेळात फेसबुक मेसेंजरवर 50 लोकांचा ग्रुप तयार करता आला. सध्या, असाही अंदाज लावला जात आहे की कदाचित हे फिचर काही इतर फीचर आणण्यासाठी काढले जात आहे.

WABetaInfo च्या मते, कंपनी या फिचरवरून वापरकर्त्यांवर लक्ष ठेवत होती आणि आकडेवारीनुसार हे फिचर पुरेसे वापरकर्ते वापरत नव्हते, ज्यामुळे ते काढले जात आहे. बातमीनुसार, हे फीचर व्हॉट्सअॅप बीटा iOS 2.21.190.11 आणि व्हॉट्सअॅप बीटा अँड्रॉइड 2.21.19.15 या दोन्ही बीटा व्हर्जनवर बंद करण्यात आले आहे.

चॅट मेनूमधून व्हॉट्सअॅपवर मेसेंजर रूम शॉर्टकट काढून टाकल्यानंतर, वापरकर्ते आता डॉक्युमेंट्स, कॅमेरा, गॅलरी, ऑडिओ आणि संपर्कांचे शॉर्टकट पाहू शकतील.

युजर त्यावर टॅप करून त्यांच्या संपर्कांसह डेटा आणि माहिती शेअर करू शकतील. याव्यतिरिक्त, व्हॉट्सअॅपने नवीन iOS बीटा व्हर्जनवर एक नवीन फिचर आणले आहे, जे युजरना तात्पुरते ग्रुप तयार करताना ग्रुप आयकॉन म्हणून इमोजी किंवा स्टिकर पटकन सेट करण्याचा अॅक्सेस देते. वाढदिवसाची पार्टी किंवा इव्हेंट सारख्या तात्पुरत्या कामासाठी ग्रुप तयार करताना हे फिचर खूप उपयुक्त ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *