पिंपरी चिंचवडमधील खेळांडूसाठी खूशखबर,; जलतरण तलाव खुले होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ सप्टेंबर । पिंपरी चिंचवड शहरातील जलतरण तलाव खुले होणार आहेत. पिंपरी चिंचवडमधील जलतरण खुले करण्याच्या निर्णयामुळं शहरातील खेळाडूंना दिलासा मिळाला आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांसाठी जलतरण तलाव खुले होणार नाहीत. जलतरण स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील सविस्तर अटी आदेशात देण्यात आल्या आहेत.

फक्त खेळांडूंना परवानगी
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून जलतरण स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाच मुभा देण्यात आली आहे. जलतरण प्रशिक्षकांचे लसीचे दोन्ही डोस असणं बंधनकारक करण्यात आले आहेत. सर्व उपाययोजना नुसार हे आदेश उद्यापासून लागू होणार आहेत. तसं परिपत्रक पालिका आयुक्त यांनी काढलं आहे.

राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कोविड- 19 या संसर्ग रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम 2020 अंमलात आलेला आहे. महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० अन्वये कोविड 19 च्या प्रसारास पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना प्राधिकृत केलेले आहे. साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार राजेश पाटील, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये कोविड 19 च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी खालीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित केला आहे.

1) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जलतरण तलाव जलतरण स्पर्धेची तयारी करणा-या खेळाडूंच्या सरावासाठी सुरु राहतील.

2) सदर ठिकाणी कार्यरत असणारे जलतरण प्रशिक्षक यांनी कोचिङ प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा (डोस) पूर्ण झालेले असणे अनिवार्य राहील.

3) या आदेशातील नमूद बाबी व्यतिरिक्त इतर बाबीसाठी 14 ऑगस्ट रोजी निर्गमित आदेश लागू राहतील.

संदर्भाय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. कोविड 19 च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे अधन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाहीस पात्र राहील. पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात हा निर्णय लागू राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *