महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ सप्टेंबर । कोरोनाच्या परिस्थितीमुळे विदेशी नागरिकांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देशात प्रवेशासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये सूट दिली जाणार आहे. तर पूर्णपणे लसीकरण झालेल्यांना नोव्हेंबरपासून अमेरिकेत प्रवेश करण्यास परवानगी असणार आहे. याबाबत व्हाइट हाउसचे समन्वयक जेफ जेंट्स यांनी असे म्हटले की, विदेशी नागरिकांना विमानातून प्रवास करण्यापूर्वी पूर्णपणे लसीकरण होण्यासह आधीचे तीन निगेटिव्ह रिपोर्ट्स दाखवावे लागणार आहेत.
परदेशी नागरिकांसाठी अमेरिकेच्या प्रवासासंदर्भात सोमवारी नवीन गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. लसीकरण न करता परतणाऱ्या अमेरिकन नागरिकांच्या तपासणीसाठीचे नियम ही बायडन सरकारने कडक केले आहेत. अशा लोकांना प्रवास सुरू करण्याच्या एक दिवस आधी आणि अमेरिकेत आल्याच्या एका दिवसात कोरोना चाचणी करावी लागेल.
पूर्णपणे ज्या लोकांचे लसीकरण झाले आहे, त्यांना विलगीकरणात ठेवण्याची गरज नाही. कोरोना महामारीनंतर अमेरिकेने गेल्या वर्षीच्या सुरुवातीला परदेशी नागरिकांच्या येण्यावर बंदी घातली. याची सुरुवात चिनी नागरिकांपासून झाली. त्यानंतर भारत आणि ब्रिटनसह इतर अनेक देशांच्या नागरिकांनावर ही बंदी घातली गेली.
जेंट्सने असे म्हटले की, विमानातून प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा फोन क्रमांक आणि अन्य माहितीसुद्धा घेतली जाणार आहे. नोव्हेंबर पूर्वी सीडीसी द्वारे याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे विमान आणि प्रवासासंबंधित अन्य एजेंसीकडून नव्या नियमानुसार प्रोटोकॉल लागू करण्यास वेळ मिळेल.