रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिल्या फाटक्या नोटांसंदर्भात ‘या’ महत्त्वाच्या सूचना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ सप्टेंबर । कधी कधी रोख रकमेची देवाण-घेवाण करताना एखादी नोट चुकून फाटली जाते. फाटलेली नोट पाहून अनेकांचा पैसे फुकट गेले असा समज होतो. अशा परिस्थितीत आपल्या पैकी अनेकांना फाटलेल्या नोटांचे काय करायचे, असा प्रश्न कधीना कधी नक्की पडला असेल. आता भारतीय रिझर्व्ह बँकेनेच याचे उत्तर दिले आहे. जर एखाद्या दुकानदाराने फाटलेली नोट घेण्यास नाकार दिला, तर ती नोट तुम्हाला बँकेत नेण्याचा आणि ती बदलण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण फाटलेल्या नोटा स्वीकारण्यास काही बँका नकार देतात. जर तुम्ही बंडल गोळा करत असाल आणि त्यात एक नोट फाटली असेल तर नोट मोजण्याची मशीन ती नाकारते. कॅशियर याचा फायदा घेत तुम्हाला ती नोट परत करतो. पण हा नियम चुकीचा आहे.

फाटलेल्या नोटा बँका नाकारू शकत नाहीत. फाटलेली नोट घेण्याची जबाबदारी प्रत्येक बँकेची आहे. काही फाटलेल्या नोटांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या भाषेत ‘सॉयल्ड नोट’ असे म्हटले जाते. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, ज्या नोटा 2 अंकांच्या आहेत, जसे की 10 ची नोट, जरी ती दोन तुकड्यांमध्ये असली तरी ती सॉयल्ड नोटेच्या श्रेणीत ठेवली जाते. बँका अशा नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाहीत. फक्त लक्षात ठेवा की नोट कापून त्याच्या नंबर पॅनेलमधून जाऊ नये. अशा कोणत्याही नोटा कोणत्याही सरकारी बँकेच्या काऊंटरवर सहज बदलल्या जाऊ शकतात.

सरकारी बँका व्यतिरिक्त दोन तुकडे झालेल्या नोटा खासगी बँकेच्या कोणत्याही चलन किंवा रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही जारी कार्यालयामध्ये सहजपणे बदलल्या जाऊ शकतात. अशा बदलांसाठी बँक तुम्हाला कोणताही फॉर्म भरण्यास सांगणार नाही. यामध्ये फॉर्म भरण्याची गरज नाही. जरी एका नोटेचे अनेक तुकडे झाले असले, तरी ते बँकेत घेतल्या जाऊ शकतात. फाटलेल्या नोटेचा कोणताही भाग गहाळ झाला तरी त्याची देवाणघेवाण करता येते. कोणत्याही चलनी नोटवर आवश्यक भाग म्हणजे जारी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव, हमी, स्वाक्षरी, अशोक स्तंभ/महात्मा गांधी यांचे चित्र, वॉटर मार्क असणं गरजेचे आहे. जर या चिन्हांमध्ये काही विसंगती दिसली तर त्यासाठी काही पैसे द्यावे लागतील.

आरबीआयने नोट परतावा नियम करण्यात आला असून अशा नोटा सरकारी बँकांच्या काउंटर, खासगी बँकांच्या चलन चेस्ट किंवा आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्ये फॉर्म भरून देखील बदलल्या जाऊ शकतात. पूर्णपणे ज्या नोटा फाटलेल्या आहेत, पूर्णपणे कापल्या आहेत किंवा संपूर्ण नोट जळली आहे, नंतर ती फक्त रिझर्व्ह बँकेच्या इश्यू ऑफिसमध्ये बदल केली जाऊ शकते. बँकांच्या काऊंटरवर ते बदलता येत नाही. आरबीआयच्या इश्यू विभागात या कामासाठी विशेष लोक नियुक्त केले जातात. याबाबतचे वृत्त एका हिंदी संकेतस्थळाने दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *