आता वाहतुकीचे नियम मोडल्यावर केवळ दंड नाही तर लायसन्सही जप्त होऊ शकतं?

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 -मुंबई
वाहतुकीचे नियम सर्व वाहनधारकांना माहिती असतीलच असं नाही. अनेकदा आपण सर्रास नियम मोडतोय याची जाणीवही वाहन चालवणाऱ्यांना नसते. याबाबत वाहतूक नियंत्रकांकडून वारंवार सूचना आणि माहिती दिली जाते. तरीही नियम मोडले जातात आणि मग दंडात्मक कारवाई होते.काही वेळा दंड म्हणून रक्कम भरावी लागते पण काही नियम असे आहेत जे मोडल्यास तुमचं लायसन जप्त केलं जाऊ शकतं. आपल्याला याची माहिती नसते आणि जेव्हा कारवाई होते तेव्हा पश्चाताप करत बसावा लागतो. कोणत्याही रस्त्यावर ठिकठिकाणी वेगाची मर्यादा दर्शवणारे बोर्ड दिसतात. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त वेगानं गाडी चालवलीत तर तुम्हाला टोलनाक्यावर अडवलं जातं. त्याठिकाणी दंड तर होतोच पण लायसनसुद्धा जप्त केलं जातं.

रस्त्यावर गर्दी असेल किंवा सिग्नल पडला असेल तर लोकांना बाजूने , फुटपाथवरून गाडी चालवण्याची सवय आहे. इतकंच काय तर लहान उंचीच्या डिव्हायडरवरून गाडी दुसऱ्या बाजुला नेतात. अशी चूक करणंही तुम्हाला महागात पडू शकतं. ओव्हरटेक करण्यासाठी अनेकदा वेगानं गाडी चालवली जाते. अशावेळी तुम्ही 40 किमी वेग मर्यादा असलेल्या रस्त्यावरून जात असाल तर अडचण नाही. पण हायस्पीडच्या रोडवरून जाताना ओव्हरटेक करणं अडचणीत आणणारं ठरू शकतं. ठरलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने गेल्यास लायसन जप्त केलं जाईल.

रस्त्याने गाडी चालवताना पाठिमागून अँब्युलन्स येत असेल तर तिला वाट दिली जाते. मात्र तुमच्याकडून गाडीला पुढे जाण्यात अडथळा निर्माण झाला कीवा वाट अडवलीत तर तुमचं लायसन जप्त होऊ शकते. तसेच 5 ते 10 हजार रुपयांचा दंडही होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *