मोबाईल बॅटरीच्या बचतीसाठी आता व्हॉटसअॅपवर येणार नवं फीचर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 -मुंबई,
व्हॉटसअॅप वापकर्त्यांसाठी खुशखबर आहे. इन्स्टंट मेसेजिंग करण्यासाठी जगभरात मोठ्याप्रमाणावर व्हॉटसअॅपचा वापर केला जातो. वापरकर्त्यांना खुश करण्यासाठी व्हॉटसअॅप आपल्या फीचरमध्ये वारंवार बदल करत असत. Android आणि Ios नंतर आता व्हॉटसअॅप वेब आणि व्हॉटसअॅप डेकस्टॉपसाठी डार्क मोड येणार आहे. सध्या Ios आणि Android मध्ये या डार्क मोडची टेस्टिंग चालू आहे.

या आधी व्हॉटसअॅप डेकस्टॉप आणि व्हॉटसअॅप वेबसाठी डार्क मोड सपोर्ट करतं नव्हत. मात्र आता WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार व्हॉटसअॅप वेबसह व्हॉटसअॅप डेकस्टॉपसाठी डार्क मोडची टेस्टिंग सुरू आहे.
प्रामुख्यानं OLED स्क्रिनवर हा डार्क मोड पूर्णपणे काळ्या रंगाचा दिसून येतो. मात्र डेक्स्टॉपवर असलेल्या रंगामध्ये फरक दिसतो आहे. व्हॉटसअॅपचा हा डार्क मोड सध्या वापरात नाही आहे. मात्र येत्या काळात या डार्क मोडचा पब्लिक बीट सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. व्हॉटसअॅपच्या Ios अॅपसाठी बीटा वर्जन डार्क मोडवर देण्यात आल आहे. हे टेस्टफ्लाइट अॅपच्या माध्यमातून हे डार्क मोड वापरू शकतो. मात्र या ब्लॉकमोडचा रंग पूर्णपणे काळा नाहीय. या डार्कमोडचा फायदा युजर्सना होणार आहे. यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी वाचणार आहे. त्यामुळे व्हॉटसअॅप युजर्स देखिल या डार्क मोडच्या फीचरची वाट पाहत आहेत.
व्हॉटसअॅपचे युजर्स दिवसेंदिवस वाढता आहेत. सुरूवातीला व्हॉटसअॅपचा वापर हा मर्यादीत होता मात्र आता व्हॉटसअॅपचा वापर वाढतो आहे. या वाढत्या युजर्सच्या गरजा लक्षात घेवून व्हॉटसअॅप आपल्या फीचरमध्ये बदल करताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *