ऑडीची ‘इलेक्ट्रिक सुपरकार’ लॉन्च, ऑडीची ही आतापर्यंतची सर्वात पॉवरफूल सीरिज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ सप्टेंबर । जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडीने हिंदुस्थानात Audi e-tron GT आणि Audi RS e-tron GT या दोन इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. ऑडीची ही आतापर्यंतची सर्वात पॉवरफूल सीरिज आहे.

Audi e-tron GT मध्ये 390 किलोवॅटची पॉवर आहे आणि ती अवघ्या 4.1 सेकंदात ताशी शून्य ते 100 किमीचा सुपरफास्ट वेग धारण करते. तर 475 किलोवॅट पॉवर असणारी Audi RS e-tron GT केवळ 3.3 सेकंदात हा वेग धारण करते.

audi-e-tron-gt

Audi e-tron GT आणि Audi RS e-tron GT मध्ये 83.7/93.4 केडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरी आहे. ती Audi RS e-tron GT साठी 401 ते 481 किमी आणि Audi e-tron GT (डब्ल्यूएलटीपी कम्पाइंड) साठी 388 ते 500 किमीची रेंज प्रदान करते.

audi-e-tron-gt3

दोन्ही कारमध्ये 270 किलोवॅट डीसी चार्जिंग पॉवर आणि 800 व्होल्ट तंत्रज्ञानासह नेक्स्ट लेवल हाय पॉवर चार्जिंग सिस्टीम असून सुमारे 22 मिनिटात पाच ते ऐंशी टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

audi-e-tron-gt4

Audi e-tron GT ची एक्स शो रुम किंमत 1 कोटी 79 लाख 99 हजार रुपये आहे, तर Audi RS e-tron GT ची एक्स शो रुम किंमत 2 कोटी 4 लाख 99 हजार रुपये आहे.

audi-e-tron-gt5

Audi e-tron GT आणि Audi RS e-tron GT या दोन्ही कार आयबिस व्हाइट, एस्कारी ब्लू, डेटोना ग्रे, फअलोरेट सिल्व्हर, केमोरा ग्रे, माइतोस ब्लॅक, सुजुका ग्रे, टॅक्टिक्स ग्रीन आणि टँगो रेड या नऊ रंगात उपलब्ध आहेत.

audi-e-tron-gt7

Audi RS e-tron GT वर मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स स्टँडर्डच्या रुपात येते. तर Audi e-tron GT वर एलईडी हेडलाइट्स स्टँडर्ड आहेत. ऑडी लेजर लाइटसह मॅट्रिक्स एलईडी हेडलँप दोन्ही कारवर एक पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.

audi-e-tron-gt-2

Audi e-tron GT आणि Audi RS e-tron GT या दोन्ही कार लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टिम आणि क्रूज कंट्रोलसह येतात तसेच यामध्ये 360 डिग्री कॅमेऱ्यांसह पार्क असिस्ट प्लस पॅकेज वैकल्पिक रुपात उपलब्ध आहे. या कार्स पॅनोरमिक ग्लास रुफने सुसज्ज असून कार्बन रुपात अपग्रेड करता येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *