LPG GAS : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर एक हजार रुपयांवर?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ सप्टेंबर । घरगुती वापराच्या एलपीजी गॅस (LPG GAS) सिलेंडरवर दिली जाणारी सबसिडी पूर्णपणे बंद करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून यामुळे गॅस सिलेंडरचे दर आगामी काळात एक हजार रुपयांवर जाऊ शकतात, अशी माहिती गुरुवारी सूत्रांनी येथे दिली. सरकारने हा निर्णय अंमलात आणला तर महागाईने आधीच होरपळत असलेल्या नागरिकांना आणखी एक झटका बसू शकतो.

सरकारने अलिकडेच एक अंतर्गत मूल्यांकन केले होते, त्यात ग्राहक गॅस सिलेंडरसाठी एक हजार रुपयापर्यंतची रक्कम देऊ शकतात, असे दिसून आले होते. त्यानुसार लवकरच सबसिडीसंदर्भात आवश्यक ते धोरण अंमलात आणले जाऊ शकते, असे समजते.

एका वर्षात सरकारने सबसिडीमध्ये सहापटीने कपात केली
सध्या आहे ती पध्दती अशीच चालू ठेवणे अथवा आर्थिकदृष्ट्या कमजोर ग्राहकांना उज्जवला योजनेच्या माध्यमातून सबसिडी देत राहणे, हे दोन पर्यायही सरकारसमोर आहेत. सबसिडी रद्द करण्याबाबत सरकारकडून अद्याप ठोस असे काहीही सांगण्यात आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *