Ducati Monster Range हिंदुस्थानात लॉन्च, किंमत 10.99 लाख रुपये…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ सप्टेंबर । सुपरबाइक बनवणारी इटलीची कंपनी डुकाटीने आपली नवीन Ducati Monster Range हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. कंपनीने याची किंमत 10.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे. डुकाटी इंडियाने आपल्या एका वक्तव्यात असे म्हटले आहे की, कंपनीने लॉन्च केलेल्या रेंजमध्ये Monster आणि Monster Pluse असे दोन व्हेरिएंट आहेत. ज्याची किंमत अनुक्रमे 10.99 लाख रुपये आणि 11.24 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

नवीन Ducati Monster Range रेड आणि डार्क स्टील्थ आणि जीपी रेड व्हील्ससह एव्हिएटर ग्रे मध्ये उपलब्ध आहे. तसेच याचे मॉन्स्टर प्लस व्हेरिएंट देखील याच रंगांमध्ये उपल्बध असून यात ग्राहकांना एरोडायनामिक विंडशील्ड आणि मागील सीट कव्हर देण्यात येणार आहे. यात सिग्नेचर मॉन्स्टर डिझाईन एलिमेंट सारखे शोल्डर-एम्बेडेड राउंड हेडलॅम्प, चंकी इंधन टाकी आणि सेंटर पोझिशन इंजिन देण्यात आले आहे.

इंजिन
या बाईकमध्ये नवीन टेस्टस्ट्रेट्टा 11 °, 937 सीसी एल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. जे डेस्मोड्रोमिक तंत्रज्ञानासह येते. या बाईकमध्ये देण्यात आलेले नवीन इंजिन 9,250 आरपीएमवर 111 एचपी आणि 6,500 आरपीएमवर 93 एनएम टॉर्क जनरेट करते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *