कोरेगाव भीमा प्रकरणातील 348 तर मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे, गृहमंत्री अनिल देशमुख्यांची माहिती

Spread the love

महाराष्ट्र 24 -मुंबई-

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. यातच आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठी माहिती दिली आहे. कोरेगाव भीमा प्रकरणातील 649 पैकी 348 तर मराठा आंदोलनातील 548 पैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती देशमुखांनी दिली. ते विधान परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, “कोरेगाव भीमा हिंसाचारातील 649 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. उर्वरित गुन्हे मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. मात्र, सार्वजनिक मालमत्तेवर आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांमधील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. याशिवाय नाणार आंदोलनातील 3 गुन्हे मागे घेतले असून शेतकरी आंदोलनातील गुन्हेदेखील मागे घेऊ”, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *