शासकीय कर्मचाऱ्यांना आता ‘योगा ब्रेक’ ; कार्यालयात दररोजच्या कामातून 5 मिनिटांचा वेळ द्यावा लागणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ सप्टेंबर । शासकीय कार्यालयात काम करताना कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजातून दिवसभरातून ५ मिनिटांचा वेळ काढून या वेळेत योगा करून दिवसभराच्या ताणतणाव दूर करून आपले स्वास्थ्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा ‘योगा ब्रेक’ प्रत्येक शासकीय कार्यालय व कर्मचाऱ्यांसाठी सक्तीचा करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वाय ब्रेक’ अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येत आहे.

त्यानुसार कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने २१ सप्टेंबरपासून निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली अाहे. आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार जळगाव विद्यापीठाने विद्यापीठ परिसर, परिसंस्था, सर्व प्रशाळा व प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना योगा ब्रेक प्रोटोकॉलनुसार घेण्यासाठी ५ मिनिटे वेळ काढण्याचे निर्देश दिले आहे. तसे प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी पत्र काढले अाहे.

कशासाठी योगा ब्रेक
कार्यालयात अधिक वेळ एकसारखे बसून राहिल्याने काम करण्याच्या सवयी बदलत आहेत. त्यामुळे तणाव वाढतो; मात्र योगक्रिया शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यही प्रभावित करतात. कार्पोरेट क्षेत्रात अनेकांना तणावाचा अनुभव येतो. पाच मिनिटांचा योगा ब्रेकचा उद्देश हा कामावरील लोकांना योगक्रियेशी परिचित करणे असा आहे.

काय आहे कर्मचाऱ्यांसाठीच्या ‘वाय ब्रेक’ या अॅपमध्ये
गुगल प्ले स्टोअरमधून वाय ब्रेक नावाचे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. यात योगाच्या पद्धती आणि फायदे सांगितले गेले आहेत. आयुष मंत्रालयाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने हे अॅप विकसित केले आहे. केंद्र सरकारने नुकताच हा अादेश काढला आहे. केंद्राने काढलेल्या आदेशात सर्व शासकीय कार्यालयांना या अॅपचा वापर करण्यास आणि तो इतरांनी करण्यासाठी प्रोत्साहन करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांना अँड्रॉइड आधारित वाय ब्रेक अॅप्लिकेशन डाऊनलोड करणे बंधनकारक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *