महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ सप्टेंबर । हिंदुस्थानी लष्कर आणि सुरक्षा बलांनी गुरुवारी एलओसीवर उरी नजीकच्या रामपूर सेक्टरमध्ये घुसखोरी करू पाहणाऱ्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हे सशस्त्र दहशतवादी नुकतेच पाकव्याप्त कश्मीरात दाखल झाले होते. त्यांनी एलओसीवरून हिंदुस्थानात घुसखोरी करण्याचा जोरदार प्रयत्न गुरुवारी सकाळी केला, पण अलर्ट असणाऱ्या सुरक्षा दलांनी त्यांचा खात्मा करीत मोठा घुसखोरीचा कट उधळला. या मृत दहशतवाद्यांकडून 5 एके-47 रायफल्स, 8 पिस्तुले आणि 70 हॅण्डग्रेनेड्स असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शिवाय त्यांच्याकडून पाकिस्तानी चलनही हस्तगत केल्याची माहिती चिनार कॉर्प्सचे कमांडर डी. पी. पांडे यांनी दिली आहे.