पेन्शनधारकांसाठी Good News ! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला ; पहा प्रक्रिया

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ सप्टेंबर । लोकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने कार्यरत आहे. या भागात आता 80 वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध निवृत्तीवेतनधारकांसाठी सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचललेय. पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात बँकेत जाऊन वार्षिक हयातीचा दाखला सादर करावा लागतो. दाखला सादर न केल्यास त्याची पेन्शनदेखील थांबवली जाऊ शकते. केंद्र सरकारच्या मते, वृद्ध पेन्शनधारकांना हा दाखला सादर करण्यासाठी बँकेत येण्याची गरज नाही. आता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे 1.89 लाख टपाल सेवक हा दाखला त्यांच्या घरून घेऊन ते बँक किंवा संबंधित विभागाकडे जमा करू शकतील.

केंद्र सरकारच्या मते, पोस्ट ऑफिसमध्ये 1.36 लाखांहून अधिक डेस्कवर वार्षिक हयातीचे दाखले सादर केले जाऊ शकतात. त्याच वेळी, पेन्शनधारकाच्या वतीने नियुक्त अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेला हयातीचा दाखलाही वैध असेल. तसेच पेन्शनधारक पोर्टलद्वारे घरी बसून वार्षिक हयातीचा दाखला सादर करू शकतात. 20 सप्टेंबर 2021 रोजी भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, पेन्शनधारकांना स्वतः बँकेला भेट देण्याची गरज नाही. पूर्वी हा दाखला दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सादर करायचा होता. आता तो नोव्हेंबर महिन्यात जमा केला जातो.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सीपीएओने जारी केलेल्या प्लान बुकनुसार पेन्शनधारकांना घरी बसून दाखला सादर करण्याची सुविधा देण्यात आलीय. योजना पुस्तकानुसार, वार्षिक हयातीच्या दाखल्यावर स्वाक्षरी करण्यासाठी नियुक्त अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आलीय. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने MeitY च्या सहकार्याने नोव्हेंबर 2020 मध्ये पेन्शनधारकांसाठी हा उपक्रम सुरू केला. पोस्टमनद्वारे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी डोअर स्टेप सेवा देण्याची तरतूद आहे. यासाठी विभागाने देशभरात पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या नेटवर्कचा वापर केला. ते डिजिटल स्वरुपात प्रमाणपत्र सादर करण्याची घरोघरी सुविधा पुरवतात.

निवृत्तीवेतनधारक ‘या’ सुविधेचा लाभ कसा घेऊ शकतात
1. निवृत्तीवेतनधारक या सुविधेचा लाभ घेण्यासाठी Google Play Store वरून Postinfo App डाऊनलोड करतात.
2. DoPPW ने 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखांमध्ये वार्षिक हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा देखील दिली आहे.
3. निवृत्तीवेतनधारक doorstepbanks.com आणि dsb.imfast.co.in/doorstep/login वापरू शकतात.
4. 18001213721, 18001037188 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधूनही सुविधेचा लाभ घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *