कळंब:-तालुक्यात जोरदार पाऊस,भाटशिरपूरा येथील पूल पाण्याखाली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ सप्टेंबर । प्रतिनिधी:-सलमान मुल्ला । कळंब । तालुक्यात गुरुवार रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. कळंब-ढोकी मार्गावर भाटशिरपुरा गावाजवळील पर्यायी पूल वाहून गेल्याने सकाळपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे.

तर याच जोरदार पावसाने काढणीस आलेले सोयाबीन चे पीक ही वाया गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकतर सोयाबीन चे कोसळते भाव व आता काढणीस आलेले सोयाबीन गेल्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे..
तर कळंब-ढोकी मार्गाचे डांबरीकरणाचे सुरू आहे परंतु या जोरदार पावसाने मंगरूळ, खामसवाडी, गोविंदपूर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने या मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला असल्याने वाहतूक ठप्प झाली होती..

कळंब तालुक्यात सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.पावसामुळे पिके पाण्यात गेल्याने पाणी आटून जाईपर्यत पिके पाण्यात राहणार असल्याने प्रचंड असे शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.

कळंब तालुक्यातील मोहा, येरमळा, कळंब, शिराढोन, गोविंदपूर, खामसवाडी मंडळात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर मांजरा नदीच्या जवळील जमिनीमधील पिके गुडघाभर पाण्यात गेली आहेत.

चौकट

काल झालेल्या जोरदार पावसामुळे शेतात गुडघाभर पाणी साचले आहे तर पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या सोयाबीन नाही याचा मोठा फटका बसला असून सोयाबीनच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

संजीवन बाबुराव मुर्गे
शेतकरी आथर्डी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *