राशीभविष्य : या राशींना दिवस शुभ ; आर्थिक लाभ होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ सप्टेंबर ।

मेष
आज दिवसभर व्यस्त रहाल, जागेविषयी व्यवहार शुभ ठरणार, आर्थिक स्थिती उत्तम व्यवसायातून मोठे लाभ. नोकरदारांना आज दिवस आरामदायी तब्येत चांगली असेल,दिवस शुभ.

वृषभ
आज खर्चात वाढ होईल.संतती कडे लक्ष असू द्या. व्यवसायात वाढ होईल . कामानिमित्त प्रवास होईल , कार्यक्षेत्रात अनेक संधी मिळवुन देतील. मोठ्या धनलाभाचे योग आहेत. दिवस शुभ.

मिथुन
आनंद देणारा प्रवास, मौजमजेसाठी खर्च. मित्रांचा सहवास असा हा दिवस शुभ असुन यश मिळवून देईल. गृहसौख्य मिळेल. घरात काही वाद होऊ देऊ नका. दिवस शुभ.

कर्क
दशम स्थानात चंद्र शुक्राच्या दृष्टीत असून नोकरी पेशा व्यक्तींना अतिशय शुभ फळ देईल. अकस्मात लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दिवस शुभ.

सिंह
भाग्य कारक घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल धन प्राप्तीचे योग येतील .पण खर्च देखील वाढेल. भावंडाची प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. दिवस शुभ.

कन्या
मानसिक स्वास्थ्य कमी राहील. उत्तरार्ध जरा त्रासाचा जाईल. थकवा जाणवेल. आर्थिक बाजू उत्तम असली तरी खर्च जपून करा.व्यवसाय चांगला चालेल दिवस मध्यम आहे.

तुला
जोडीदाराला वेळ द्या. आज काही चांगली घटना घडेल. आर्थिक लाभ होतील. खर्च बेताने करा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दिवस चांगला जाईल .दिवस चांगला आहे .

वृश्चिक
आज प्रकृती जरा नरम ठेवेल. शरीर शिथिल, मन अस्वस्थ राहील. आर्थिक स्थिती सांभाळा. आवाका पाहून खर्च करणे योग्य राहील. धार्मिक कार्यात मन रमेल , दिवस मध्यम.

धनु
आज संतती साठी थोडी चिंता वाटेल. शैक्षणिक बाजू चांगली राहील. त्यांचे प्रश्न मार्गी लावावे लागतील. तृतीय गुरू शनि पराक्रमाची वाढ करतील. आर्थिक बाजू ठीक राहील. दिवस चांगला .

मकर
आज आपणास धनलाभाचे योग्य आहेत , नियमित कामे नीट पार पडतील.नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर राहणार आहे. वादविवाद टाळा , दिवस शांततेत घालवा.

कुंभ
आज मौजमजेसाठी प्रवास योग आणेल. बहिण भावाच्या भेटीचा योग. किंवा महत्त्वाचे फोन येतील. व्यवसायाची चिंता करू नका , प्रकृती जपा. दिवस चांगला जाईल.

मीन
आर्थिक लाभ, कौटुंबिक कारणांसाठी खरेदी, प्रवास, असा हा दिवस अतिशय आनंदात जाईल. दोघांनी मिळून काम पार पाडावे. व्यवसाय धंद्यात नवीन संधी मिळतील. दिवस शुभ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *